शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सत्ताधारी-विरोधकांच्या सहमतीनंतर समित्यांवर सदस्यांची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:12 IST

गटनेत्यांच्या बैठकीत विषय समित्यांवर पक्षनिहाय जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सहमतीनंतर विविध १० विषय समित्यांवर सदस्यांची मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना विषय समित्यांचे खाते वाटप आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह विविध १० विषय समित्यांच्या ८३ सदस्य पदांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी ११ फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी समितीनिहाय सदस्यांकडून अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप बहुजन महासंघ आणि शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी विरोधी पक्षांच्या सहमतीनंतर १० विषय समित्यांवर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीसह जलव्यवस्थापन व स्वच्छता, कृषी, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, आरोग्य , पशुसंवर्धन व दुग्धशाळा, महिला व बालकल्याण आणि अर्थ इत्यादी १० विषय समित्यांवर सदस्य म्हणून ८३ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भारिप-बमसं २५, शिवसेना १३, भाजप ७, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस ३ व अपक्ष १ इत्यादी जिल्हा परिषद सदस्यांची विषय समित्यांवर निवड करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सहमती झाल्याने विषय समित्यांवर सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीसाठी पक्षाच्यावतीने राज्य प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व प्रदीप वानखडे यांनीही प्रयत्न केले.गटनेत्यांच्या बैठकीत सहमती!जिल्हा परिषदेच्या विविध १० विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर भारिप-बमसं गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांच्या कक्षात जिल्हा परिषदेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेचे गटनेता आशीष ऊर्फ गोपाल दातकर, भाजपच्या गटनेता माया कावरे, काँग्रेसचे गटनेता सुनील धाबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेता सुमन गावंडे उपस्थित होत्या. गटनेत्यांच्या या बैठकीत विषय समित्यांवर पक्षनिहाय जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली. त्यानंतर मतदान न घेता, बिनविरोध सदस्यांची विषय समित्यांवर निवड करण्यात आली.

बाबासाहेब धाबेकर यांना श्रद्धांजली!जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांना दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद