शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

खासदार आदर्श ग्रामसाठी चार गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:03 IST

या गावासाठी प्रभारी अधिकारी म्हणून त्या त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सासंद आदर्श ग्राम योजनेमध्ये अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील चार गावांची निवड केली आहे. यामध्ये सन २०१९-२० साठी पातूर तालुक्यातील माळराजूरा, सन २०-२१ साठी अकोट तालुक्यातील उमरा, सन २१-२२ साठी बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड, सन २२-२३ साठी बाळापूर तालुक्यातील निंबा गावाचा समावेश आहे. या गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व विभागाच्या योजनाचे एकत्रीकरण करुन १५ सप्टेंबरपर्यंत ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, उप-जिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मरसाळे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, दीपक बाजड, शिधणाधिकारी प्रकाश मुकूंद, सहा. वनसंरक्षक सुरेश बदोले, गटविकास अधिकारी गोपाल बोंडे, विनोद शिंदे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुनील मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. निवड केलेल्या गावात जनजागृती व्हावी, यासाठी गावाच्या सीमेवर सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवड झाली असल्याचा फलक दर्शनी भागात लावावे, तसेच गावातील ग्रामस्थाच्या संमतीने व तज्ज्ञ लोकांच्या मदतीने ग्रामविकास आराखडा तयार करावा.२0१९-२० मध्ये निवड झालेल्या माळराजुरा या गावाचा ग्रामविकास आराखडा ५ सप्टेंबर पूर्वी तयार करावा. या गावासाठी प्रभारी अधिकारी म्हणून त्या त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे. आदर्श गावात शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत सोईसुविधा उपलब्ध होईल, असा सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

 

टॅग्स :Akolaअकोला