शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा स्थायी समितीसाठी १० सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:45 IST

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आठ सदस्यांसह आणखी दोन सदस्य शुक्रवारी पायउतार झाले. त्यांच्या जागेवर नवीन १० सदस्यांची निवड करण्यात आली.

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आठ सदस्यांसह आणखी दोन सदस्य शुक्रवारी पायउतार झाले. त्यांच्या जागेवर नवीन १० सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपचे पाच, काँग्रेस व शिवसेनेमधून प्रत्येकी दोन व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीतील एका सदस्याचा समावेश आहे.येत्या २८ फेब्रुवारी रोजी मनपाच्या स्थायी समितीमधील १६ पैकी आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने संबंधित सदस्यांना पदावरून निवृत्त व्हावे लागले. यामध्ये सत्तापक्ष भाजपमधील पाच सदस्यांचा समावेश होता. उर्वरित तीन सदस्यांमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही आघाडीतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी दुपारी मनपात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी शिवसेनेच्या मंजूषा शेळके व काँग्रेसचे इरफान खान यांनी राजीनामा दिल्यामुळे एकूण १० सदस्यांची निवड करण्यात आली.यांची झाली निवड!भाजप- राहुल देशमुख, अनिता चौधरी, दीपाली जगताप, माधुरी मेश्राम, हरीश काळे.शिवसेना- मंगेश काळे, गजानन चव्हाण (एक वर्षासाठी)काँग्रेस- फिरोज खान, जैनबबी शेख इब्राहिम (एक वर्षासाठी)राष्ट्रवादी- फैयाज खान (एक वर्षासाठी)यांचा कार्यकाळ संपुष्टात!विद्यमान स्थायी समितीमधून सभापती विशाल इंगळे, बाळ टाले, सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, शिवसेनेच्या सपना नवले, काँग्रेसच्या शाहीन अंजुम मेहबुब खान व राकाँप्रणित लोकशाही आघाडीच्या उषा विरक यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला.सभापती पदाकडे लक्षस्थायी समितीचे विद्यमान सभापती विशाल इंगळे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागले. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती पद रिक्त झाले आहे. सभापती पदासाठी भाजपमधून नेमकी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका