उरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंत्री मलकापूर येथे अवैध देशी दारूची विक्री करीत असलेल्या दोन महिलांनी उरळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १,४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अंत्री मलकापूर येथे अवैध देशी दारू विक्री करताना अनिता गणेश डाबेराव व कमलाबाई सुखदेव डाबेराव यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई जामदार दादाराव लिखार, पोकाँ प्रवीण मोरे यांनी केली.
गावठी दारू जप्त; दोन महिलांना अटक
By admin | Updated: April 8, 2017 01:06 IST