शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाण, काटेपुर्णा धरण परिसरात बसविणार भूकंपमापक यंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 10:08 IST

कंपमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २९ जून रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास दिला.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भूकंपासंदर्भात अचूक नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि वान या दोन धरणांंच्या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास आदेश दिला आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी भूकंपमापक यंत्र लावण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील भूकंपासंदर्भात घटनांची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम २५, ३० व ३१ नुसार जिल्ह्यात विविध आपत्तीसंदर्भात पूर्वतयारी, प्रतिबंध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अधिकार आहेत. त्यानुसार भूकंप यासारख्या आपत्तीसंदर्भात अचूक माहिती प्राप्त होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा आणि तेल्हारा तालुक्यातील वान इत्यादी दोन धरणांच्या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २९ जून रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास दिला. त्यानुसार जिल्ह्यातील दोन धरणांच्या ठिकाणी पाटबंधारे विभागामार्फत दोन भूकंपमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूकंपासंदर्भात आपत्तीची अचूक माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील काटेपूर्णा व वान या दोन धरणांच्या परिसरात भूकंपमापक यंत्र बसविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास दिला आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार असल्याने, भूकंपासंदर्भात अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्पKatepurna Damकाटेपूर्णा धरणEarthquakeभूकंप