शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

पुढच्या वर्षी शेतकर्‍यांना देणार देशी बीटी कपाशीचे बियाणे - कुलगुरू डॉ. विलास भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:52 IST

अकोला : सर्वच प्रकारच्या बोंडअळीला प्रतिरोधक देशी बीटी कपाशीचे बियाणे पुढच्या वर्षी शेतकर्‍यांना उपलब्ध केले जाईल, त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन व पीक संरक्षणाची माहिती २७ डिसेंबरपासून अकोल्यात सुरू  होणार्‍या राज्यस्तरीय कृषी प्रशर्नातून शेतकर्‍यांना देण्यात येईल. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर करतील, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आज कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वच प्रकारच्या बोंडअळीला प्रतिरोधक देशी बीटी कपाशीचे बियाणे पुढच्या वर्षी शेतकर्‍यांना उपलब्ध केले जाईल, त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन व पीक संरक्षणाची माहिती २७ डिसेंबरपासून अकोल्यात सुरू  होणार्‍या राज्यस्तरीय कृषी प्रशर्नातून शेतकर्‍यांना देण्यात येईल. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर करतील, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी मंगळवारी दिली.भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंंत कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार असून, अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच जिल्हय़ातील सर्व आमदार, कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सदस्यांची उपस्थिती राहील, अशी महिती डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठ शेतकरी सदनातील शेतकरी जागर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावर्षी बीटी कापसावर आलेल्या बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान झाले असून, कीटकनाशकांच्या अशास्त्रीय वापरामुळे शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले. कृ षी विद्यापीठाने फवारणीपूर्वी घ्यायची काळजी यासंदर्भात शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी कृषी प्रदर्शनात दर्शनीस्थळी कीटकशास्त्र विभागाचे दालन उघडण्यात आले आहे. येथे शेतकर्‍यांच्या किडीसंदर्भातील प्रत्येक विषयाची इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन व पीक संरक्षण कसे करावे तसेच सेंद्रिय शेती विकास व संशोधनाची माहिती शेतकर्‍यांना देण्यात येईल. या दोन्ही विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात शेतकर्‍यांना उद्भवणार्‍या शंकांचे निरसन केले जाईल. शेतकर्‍यांना शुद्ध व दज्रेदार बियाणे मिळावेत, यासाठी कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालये, शाळांना बीजोत्पादनाचा कार्यक्रम दिला जाणार आहे. बीटी कापसाला पर्याय म्हणून देशी बीटीचे संशोधन कृषी विद्यापीठाने महाबीज व एका खासगी कंपनीसोबत पूर्ण केले आहे. एका बीटीची चाचणीही पूर्ण झाली आहे. पुढच्या वर्षी ही बीटी शेतकर्‍यांना देण्यात येईल. शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यावर भर दिला जाणार आहे.कृषी शैक्षणिक गुणवत्ता वाढीवरही भर देण्यात येत असून, कृषी विद्यापीठाचा ढासळलेला दर्जा व केंद्रीय पातळीवर घसरलेले मानांकन पुन्हा प्राप्त करण्यासाठी कृषीच्या सर्वच क्षेत्राचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, प्रसिद्धिप्रमुख डॉ. किशोर बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

३१0 दालने कृषी प्रदर्शनात चार डोम व ३१0 दालने असून, शेतकर्‍यांना शेतीसाठी आवश्यक सर्वच प्रकारची माहिती येथे उपलब्ध असेल. शेतीपूरक व्यवसायासाठी पशुसंवर्धन, कृषी अवजारांची माहिती शेतकर्‍यांना देण्यात येईल. शेतकर्‍यांचे संशोधन, बचत गटाला प्रोत्साहन देण्यासाठी दालने येथे आहेत. 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर