शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

By संतोष येलकर | Updated: July 28, 2023 18:53 IST

यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांकडून तक्रारींची तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधी पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी रखडली होती. गेल्या ५ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप पेरणी सुरु झाली. खरीप हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. 

त्यामध्ये पेरणी केल्यानंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमधील कृषी विभागाकडे २६ जुलैपर्यंत संबंधित शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या. त्यामध्ये काही ठिकाणी शेतात पेरलेले बियाणे पूर्णतः उगवले नाही तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे कमी प्रमाणात उगवले, अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा अहवाल पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला असून, बियाणे उगवले नसल्याच्या संबंधित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांद्वारे सुरु करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय शेतकऱ्यांकडूनप्राप्त तक्रारींची अशी आहे संख्या !तालुका             तक्रारी

  • पातूर             २५
  • बार्शिटाकळी            १५
  • अकोला             १४
  • मूर्तिजापूर             १२
  • बाळापूर             ०८
  • तेल्हारा             ०५
  • अकोट             ०३

 सोयाबीनच्या ८१ तर कपाशी बियाण्याची एक तक्रार  जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत सोयाबीन आणि कपाशी बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या ८१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, कपाशीचे बियाणे उगवले नसल्याची एक तक्रार प्राप्त झाली आहे.

तालुकास्तरीय समित्या करणार तक्रारींचे निवारण पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवार समित्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेलापेरणीचा खर्च बुडालापेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसल्याने, पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसल्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून किती आणि कधी नुकसान भरपाई दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी