शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’त मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाचे अश्लील चाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:12 IST

शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, संतप्त मुलींनी याप्रकरणी जीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुलींच्या सुरक्षेसाठी तैनात एका सुरक्षा रक्षकानेच मुलींसमोर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात घडला. यापूर्वीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहात असे प्रकार घडले असून, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे महाविद्यालयाची अब्रू राखली जात असली, तरी मुलींची अब्रू मात्र धोक्यात आहे.सर्वोपचार रुग्णालय परिसरातच वैद्यकीय विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. या ठिकाणी मुलींना पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने रात्री पाण्यासाठी वसतिगृहाबाहेर पडावे लागते. मुलींच्या सुरक्षेसाठी येथे एका वयस्क सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली; परंतु या सुरक्षा रक्षकाने मुलींसमोरच चक्क अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, संतप्त मुलींनी याप्रकरणी जीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली. यावेळी डॉ. श्यामकुमार शिरसाम यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. मुलींनी याप्रकरणी तक्रारही दिली; मात्र त्यानंतर मुलींनी तक्रार मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दबावतंत्र की बदनामीची भीती?जीएमसीत मुलींच्या वसतिगृहात यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. वर्षभरापूर्वी एक निर्वस्त्र व्यक्ती मुलींच्या वसतिगृहात शिरल्याची घटना घडली होती. अशा घटना वारंवार होत असल्या, तरी केलेल्या तक्रारी मागे घेतल्याची माहिती आहे. या तक्रारी मागे घेण्यासाठी दबाबतंत्राचा उपयोग होत आहे, की मुलींमध्ये बदनामीची भीती, हा संशोधनाचा विषय आहे.

मुलींना पाहून इशारेमुलींसमोर अश्लील चाळे करण्याचा प्रकार ताजा असतानाच दुसऱ्याच दिवशी एका आॅटो चालकाने विद्यार्थिनींना वाईट हेतूने इशारे केल्याचा प्रकार घडल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली आहे; परंतु बदनामी होईल म्हणून या विद्यार्थिनी समोर येण्यास घाबरत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय