शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून पाणीटंचाईवरील उपायांचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:25 IST

पाणी पुरवठय़ाअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही एमआयडीसी प्रशासकीय अधिकार्‍यांना गेल्या दहा वर्षापासून पाणीटंचाईवर अजूनही पर्याय शोधलेला नाही असा गंभीर आरोप अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

ठळक मुद्देअकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी पुरवठय़ाअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही एमआयडीसी प्रशासकीय अधिकार्‍यांना गेल्या दहा वर्षापासून पाणीटंचाईवर अजूनही पर्याय शोधलेला नाही असा गंभीर आरोप अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. अकोला आणि खामगाव येथील पाणीटंचाईवर कशी मात करता येते, अकोल्यात असा पर्याय का शोधता येत नाही  यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एमआयडीसीच्या अमरावती विभागाचे आयुक्तांनी २४ नोव्हेंबर रोजी बैठक बोलाविली आहे. मात्र, अजूनही अकोल्यातील एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे नवीन पर्याय उपलब्ध नाहीत.अमरावती विभागात अकोल्यातील एमआयडीसी अव्वल क्रमांकावर आहे. सर्वांत जास्त महसूल अकोल्याचा असतो. मात्र, सुविधा पुरविण्यात अकोल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. पाण्याची समस्या उद्भवली की सर्वांत आधी अकोल्यातील शेकडो उद्योगांचा पाणी पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे उद्योजकांना कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागतो. वारंवार येणार्‍या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनने तब्बल दहा वर्षांपासून सातत्याने निवेदन दिले आहे. पूर्णा नदीवर बॅरेज बांधावा किंवा तापीतील पाणी मलकापूरमार्गे वळवावे, अप्पर वर्धातून पाणी वळविण्यात यावे, कुंभारी तलावाचा उपसा करून त्याची क्षमता वाढवावी, असे अनेक उपाय सूचविले. दहा वर्षांपासून इंडस्ट्रिजच्या पदाधिकार्‍यांचे निवेदन स्वीकारण्याचे काम एमआयडीसी प्रशासन करीत आहे. मात्र, कायमस्वरूपी पर्याय अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी यंदा नवीन पर्यायांची मोठी यादीच तयार करून ठेवली आहे. 

केवळ प्लॉट देण्याचे आणि महसूल वसूल करण्याचे काम एमआयडीसी प्रशासनाचे नाही. मुबलक वीज आणि पाणी पुरवठा करण्याची जबाबदारीही एमआयडीसी अधिकार्‍यांची आहे. इंडस्ट्रिजच्या निवेदनाकडे डोळेझाक करू नये.- कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, इंडस्ट्रिज असो. अकोला.

 

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळwater transportजलवाहतूक