शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध!

By admin | Updated: March 28, 2016 01:38 IST

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी संजय खोडके, अविनाश चौधरी, भय्या मेटकर यांची नावे आघाडीवर.

अकोला: विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवाराचा शोध काँग्रेसने सुरू केला आहे. त्यासाठी प्रदेश सचिव संजय खोडके यांच्यासह भय्या मेटकर आणि अविनाश चौधरी यांचे नावे आघाडीवर आहेत. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गत बुधवारी मुंबईत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. या मुलाखतीसाठी प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, भय्या मेटकर, लतीफ देशमुख आणि अविनाश चौधरी या अमरावतीतील उमेदवारांसह बुलडाणा जिल्ह्यातील प्रा. संतोष आंबेकर आणि समीर नागोळे यांनी मुलाखती दिल्यात. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे करीत आहेत. राज्यमंत्र्यांच्या विरोधात अमरावती पदवीधर मतदारसंघात लढाई असल्यामुळे काँग्रेसने आतापासून सावध पावले टाकायला प्रारंभ केला आहे. संजय खोडके हे गत सहा महिन्यांपासून पदवीधर मतदारसंघ लढविण्याची तयारी करीत आहेत तसेच भाजपचे पदाधिकारी असलेले अविनाश चौधरी हेदेखील मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात दाखल झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य भय्यासाहेब मेटकर हेदेखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.