शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत लाभार्थी अर्जांची छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:50 IST

लाभार्थींकडून प्राप्त अर्जांची छाननी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आली.

अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थींकडून प्राप्त अर्जांची छाननी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आली. त्यामध्ये लाभार्थींची संख्या कमी आणि अर्जांची संख्या अधिक होत असल्याने निवड कशी करावी, या मुद्यांवर पदाधिकारी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या लाभार्थी योजना राबविण्यासाठी दरवर्षी मार्च उजाडतो. त्या योजना राबविण्यासाठीचा कालावधीही शासनाने ठरवून दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासकीय पातळीवर कमालीची दिरंगाई होते. परिणामी, लाभार्थी वंचित राहतात. हा प्रकार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया आणि वेळापत्रकही ठरवून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांसह पंचायत समित्यांना दिले. त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर सर्वच विभागातील योजनांचे अर्ज २८ जूनपर्यंत स्वीकारण्यात आले. पात्र, अपात्र अर्जांची यादी तयार झाली. त्या अर्जांबाबत २ जुलै रोजी आक्षेप व त्रुटींसाठी संधी देण्यात आली. पात्र लाभार्थी अर्जांवर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभेत ३ किंवा ४ जुलै रोजी मंजुरी दिली जाणार आहे. मंजूर लाभार्थी यादी ५ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.- अर्जासाठी मुदतवाढ द्या!विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्यास लाभार्थींना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपचे विरोधी पक्षनेते रमण जैन यांनी केली. अर्ज सादर करण्याला मुदतवाढ देण्यावर उद्या निर्णय घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.- कागदपत्रांची संख्या कमी करा!अर्जासोबत जोडावयाच्या कागदत्रांची संख्या कमीत कमी असावी, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र अर्जावर कागदपत्रांची मोठी यादी आहे. हा विरोधाभास जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर मंगळवारीच पत्र काढून कागदपत्रांची संख्या कमी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद