शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचा ‘स्क्रीन टाइम’ सर्वांगीण विकासासाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:19 IST

अकोला : बौद्धिक व शारीरिक विकासाच्या वयात चिमुकल्यांचा बहुतांश वेळ ‘मोबाइल स्क्रीन’वर जात आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बौद्धिक व शारीरिक विकासाच्या वयात चिमुकल्यांचा बहुतांश वेळ ‘मोबाइल स्क्रीन’वर जात आहे. हा स्क्रीन टाइम चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घातक ठरत असून, पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या जगतात हल्ली मोठ्यांपेक्षा जास्त चिमुकली मुले टेक्नोसॅव्ही असल्याचे कौतुक पालकांकडून केले जाते. मूल दोन अडीच वर्षाचे होत नाही, तोच त्याच्या हाती मोबाइल दिल्या जातो; मात्र काही काळाचे हे कौतुक मुलांवर दीर्घकालीन घातक परिणाम करत आहे याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. बौद्धिक अन् शारीरिक विकासाचे मूलभूत शिक्षण घेण्याचा बहुतांश वेळ स्क्रीन टाइमवर घालवल्याने त्यांच्या नैसर्गिक व्यक्तिमत्त्व विकासावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. मूल जसजसे मोठे होऊ लागते, तसतशी त्याच्यातील आक्रमकता, एकाकीपणा यासारखी लक्षणे आढळू लागते.त्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक विकासावर तसेच अभ्यासावरदेखील दिसून येतो. अशा परिस्थितीत पालकांनी वेळीच चिमुकल्यांना मोबाइलपासून दूर ठेवावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले.

काय म्हणतो डब्ल्यूएचओचा अहवाल?

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसारस्क्रीन टाइम हा लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोकादायक ठरत आहे. यानुसार दोन महत्त्वाच्या बाबी डब्ल्यूएचओने स्पष्ट केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले असून, ते याप्रमाणे. ० ते २ वर्ष वयोगटातील बालकांपुढे मोबाइल नेण्यास सक्तीने टाळा. २ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना एक तासापेक्षा कमी वेळेसाठी मोबाइल द्या; पण या वेळेतही काही काळ विश्रांतीची असावी. 

पालकांनी हे करावे

  •  शक्यतो लहान मुलांच्या हाती मोबाइल देणे टाळा
  •  मोबाइल दिल्यास १५ ते ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ नको
  •  मुलांसोबत संवाद साधा, त्यांना वेळ द्या.

 मूलभूत गोष्टी शिकण्याच्या वयात मुलांच्या हाती मोबाइल आला आहे. पालकांचा मुलांसोबतचा संवाद तुटल्याने त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर घातक परिणाम होत आहे. कमी वयातच मुले आक्रमक होत असून, यावर पालकांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.- डॉ. श्रीकांत वानखडे, मनोविकार तज्ज्ञ,प्रेरणा प्रकल्प, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य