शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील शाळा होतील ‘हायटेक’!

By admin | Updated: September 21, 2016 02:13 IST

रोटरी क्लबचा पुढाकार; लोकवर्गणीतून डिजिटल क्लासरूम.

संतोष वानखडे वाशिम, दि. २0 - ग्रामीण भागातील दुर्गम परिसरात वसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून हायटेक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळणार आहे. वाशिम जिल्हय़ात गतवर्षी लोकवर्गणीतून १२७ शाळांना 'डिजिटल'ची जोड मिळाली असून, यावर्षी रोटरी क्लबनेदेखील १२ शाळांची चाचपणी केली आहे.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला असतो, अशी ओरड नेहमीच होत आली आहे. हा समज पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला गतवर्षापासून सुरुवात केली. गतवर्षी १२७ गावांतील पालकांनी लोकवर्गणीतून ह्यडिजिटलह्ण वर्गखोली तयार करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.वाशिम जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा एकूण ५७ शाळा आहेत. दोन्ही मिळून ८३0 शाळा असून, दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे पाऊल पडत आहे. ग्रामस्थ, पालकांच्या लोकवर्गणीतून गतवर्षी जिल्हय़ात १२७ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यावर्षी रोटरी क्लबने सुरुवातीलाच काही शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुषंगाने अडीच महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांच्याशी रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी चर्चादेखील केली. जिल्हय़ातील दुर्गम भागातील १२ शाळांची चाचपणी करून तसा अहवाल रोटरी क्बलने वरिष्ठांकडे सादर केला आहे. वरिष्ठांची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्राथमिक स्वरूपात या १२ शाळांमध्ये आवश्यक त्या अद्ययावत सुविधा पुरविल्या जातील. डिजिटल वर्गखोलीच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांंंना अभ्यासाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर्षीदेखील लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेत 'डिजिटल क्लासरूम' ही संकल्पना साकारली जाणार आहे.