शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सिद्धी मूल्यांकनात केवळ ८८ शाळा पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 01:45 IST

अकोला- मनपाची एकही शाळा ए ग्रेड प्राप्त करू शकली नाही. जिल्ह्यातील ९६० शाळांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डी ग्रेड देण्यात आला.

मनपाची एकही शाळा ‘ए ग्रेड’मध्ये नाही: ९६० शाळांमध्ये विद्यार्थी सुविधांपासून वंचितनितीन गव्हाळे - अकोलाशाळा सिद्धी योजनेंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शासकीय व खासगी शाळांचे मूल्यांकन करून शाळांमधील सोयी-सुविधा, इमारत, विद्यार्थी संख्या आदींची आॅनलाइन माहिती मागविली होती. या शाळा सिद्धी योजनेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यात केवळ ८८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केला. मनपाची एकही शाळा ए ग्रेड प्राप्त करू शकली नाही. जिल्ह्यातील ९६० शाळांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डी ग्रेड देण्यात आला. शासनाने राज्यात शाळा सिद्धी योजना सुरू करून शाळांनीच शाळेत असणाऱ्या सोयी-सुविधांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल आॅनलाइन पुण्यातील शैक्षणिक संस्था विद्या प्राधिकरणाकडे पाठविण्यास सांगितले होते. यूजीसीच्या नॅक कमिटीद्वारे वरिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करून त्यांना ग्रेड दिला जातो. त्याच पृष्ठभूमीवर शासनाने शाळा सिद्धी योजना सुरू केली. शैक्षणिकदृष्ट्या आणि सोयी-सुविधांच्या बाबतीत शाळांमधील एकंदरीत परिस्थिती समोर यावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. शाळा सिद्धी योजनेंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शासकीय शाळांसोबतच खासगी शाळांचेसुद्धा मूल्यांकन करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठीचे प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का, विद्यार्थ्यांना बैठकीची व्यवस्था, इमारत सुसज्ज आहे का, प्रयोगशाळा, सांस्कृतिक सभागृह, खेळांसाठी क्रीडांगण, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी बससेवा आदी सुविधा आहेत का, याबाबत मूल्यांकन करून त्यासंबंधीचा अहवाल विद्या प्राधिकरणाला आॅनलाइन पाठविला होता. या अहवालानुसार विद्या प्राधिकरणाने जिल्ह्यातील शाळांचे पुनर्मूल्यांकन करून त्यांना ग्रेड दिले आहेत. शाळा सिद्धी योजनेमध्ये १८२८ शाळांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी केवळ ८८ शाळांनीच ९० टक्के गुण प्राप्त करीत ए ग्रेड प्राप्त केला. १६९ शाळांनी ८९ टक्के गुण मिळवित बी ग्रेड मिळविला, तर ४७६ शाळांनी सी ग्रेड प्राप्त केला आणि ९६० शाळांनी डी ग्रेड प्राप्त केला.शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळेतील भौतिक वातावरण, गुणवत्ता, सुविधा, उपलब्धता यावर मूल्यांकन करण्यात आले आणि त्याआधारे शाळांना गुण देण्यात आले. ‘ए ग्रेड’ प्राप्त करणाऱ्या शाळांना शाळा सिद्धीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद