शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणास शाळांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:18 IST

मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अद्यापही २६ हजार १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी आहेत.

अकोला: मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाइन नव्याने आणि भरलेल्या अर्जांचे नूतनीकरण करून पडताळणी करण्याचे काम २३ जुलैपासून सुरू आहे; परंतु शाळा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, शिक्षण विभागालासुद्धा शिष्यवृत्तीचे नव्याने अर्ज भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी वारंवार मुदत वाढवावी लागत आहे. मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अद्यापही २६ हजार १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी आहेत.मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाइन अर्जांच्या पडताळणीचे काम शिक्षण विभागाच्या माध्यमातून २३ जुलै २0१८ पासून करण्यात आले आहे. यासंदर्भात शाळा, मुख्याध्यापकांना वारंवार सूचनासुद्धा देण्यात आल्या, नंतरही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणाचे आणि नव्याने अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३0 सप्टेंबरपर्यंत होती; परंतु शाळा, मुख्याध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, शिक्षण विभागाने ही मुदत दुसºयांदा ३१ आॅक्टोबरपर्यंत वाढविली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांचे नव्याने आणि भरलेल्या अर्जांचे नूतनीकरण करून घ्यावेत, अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही. ही जबाबदारी पूर्णत: मुख्याध्यापक व शाळेची राहील. नूतनीकरणासाठी जिल्ह्याचे ४४,९१0 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या याद्या इन्स्टिट्युट लॉगिनला एनएसपीकडून टाकण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे उत्पन्न व मागील वर्षाच्या परीक्षेचे शेकडा प्रमाण टाकून, अर्ज भरावयाचे होते; परंतु आतापर्यंत केवळ १८ हजार ७३१ विद्यार्थ्यांच्या नूतनीकरणाचे अर्ज भरून झाले आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्तीSchoolशाळा