शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील घटनेमुळे अकोल्यातील बँका सतर्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:47 IST

अकोल्यातील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँका सतर्क झाल्या असून, या बँकांनी सोमवारी सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती आहे. शहरातील बँकांची सुरक्षा व स्ट्राँगरूम, त्यातील खातेदारांचे लॉकर सुरक्षित असून, बँकांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेली आहे, अशी माहिती बँकांच्या अधिकार्‍यांनी दिली. 

ठळक मुद्दे बँकांनी घेतला सुरक्षेचा आढावाबँकांमधील स्ट्राँगरूम सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवी मुंबईतील जुई नगरातील बँक ऑफ बडोदावर दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची घटना रविवारी घडली. या घटनेच्या पृष्ठभूमीवर अकोल्यातील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँका सतर्क झाल्या असून, या बँकांनी सोमवारी सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती आहे. शहरातील बँकांची सुरक्षा व स्ट्राँगरूम, त्यातील खातेदारांचे लॉकर सुरक्षित असून, बँकांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेली आहे, अशी माहिती बँकांच्या अधिकार्‍यांनी दिली. मुंबईतील बँक ऑफ बडोदा शाखेजवळच्या दुकानातून ४0 फुटांचे भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला आणि बँकेतील २७ लॉकर फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण कोट्यवधी रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेच्या पृष्ठभूमीवर शहरातील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँकांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. शहरातील बँकांमध्ये भविष्यात अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून सर्वच बँकांच्या अधिकार्‍यांनी सोमवारी बँक व परिसरातील सुरक्षेच्या आढाव्याची माहिती घेतली. बँकांमध्ये लाखो खातेदारांचे अब्जावधी रुपये व सोन्याचे दागिने आहेत. त्यासाठी खातेदारांना लॉकर्स दिलेले आहेत. बँकांमधील स्ट्राँगरूममध्ये खातेदारांचे लॉकर्स आहेत. बँकांमधील स्ट्राँगरूम, त्यातील लॉकर्स सुरक्षित आहेत का, याचा या घटनेमुळे खातेदारांच्या मनामध्ये शंका उपस्थित होणे साहजिक आहे. त्यानुषंगाने बँक अधिकारी सतर्क झाले आहेत. त्यांनी बँक व परिसरातील सुरक्षेचा आढावा घेताना, तेथील सीसी कॅमेरा, अलार्म सिस्टीम आणि सुरक्षारक्षकांचा पहारा याबाबत माहिती जाणून घेतली असता, सर्वच बँका खातेदारांच्या पैशांबाबत खबरदार आणि तेवढय़ाच सतर्क असल्याचे दिसून आले. शहरातील स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी बँकांसोबतच अकोला अर्बन बँक, अकोला जनता कर्मशिअल बँक, बुलडाणा अर्बन बँक या मल्टिस्टेट बँकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्कता बाळगण्यात आली आहे. 

राष्ट्रीयीकृत बँकांमधील लॉकर सुरक्षितअकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्या लॉकरची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे समोर आले. राष्ट्रीयीकृत बँकांमधील लॉकरही सुरक्षित असून, त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे लॉकर तळमजल्यावर नसून, ते पहिल्या किंवा वरच्या माळय़ावर असल्याचेही बँक अधिकार्‍यांनी सांगितले. बँके तील लॉकर व सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे बँक अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

लॉकर व सुरक्षेची तपासणीराष्ट्रीयीकृत बँकांतील लॉकर रूम व कॅशियर विभागाची नियमित तपासणी करण्यात येते. एवढेच नव्हे, तर सुरक्षेची पाहणी अकोला पोलिसांकडून रोजच करण्यात येत असल्याचेही बँक अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. लॉकर रूमची नियमित तपासणी अंतर्गत बाबीतूनही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. लॉकर रूममध्ये रोजच ये-जा असल्याने अशा प्रकारची घटना राष्ट्रीयीकृत बँकेत घडणे शक्य नसल्याचेही यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले.

मुंबई येथील बँकेतील दरोड्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर आमच्या बँकेतील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. आमचे सुरक्षारक्षक सतर्क असून, अलार्म सिस्टीम, सीसी कॅमेरे आदी व्यवस्था आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँक सतर्क असून, खातेदारांच्या धनाची सुरक्षेविषयी आम्ही सजग आहोत. - नरेंद्र अग्रवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जनता बँक.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमच्या बँकेमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच २४ तास बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा सतत पहारा असतो. - शंतनू जोशी, सचिव, अकोला अर्बन बँक.

टॅग्स :bankबँक