शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शालेय योजनांचे मुल्यमापन होणार बाह्य यंत्रणेमार्फत

By admin | Updated: July 31, 2015 22:37 IST

शैक्षणिक सत्र २0१५-१६ पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सर्व योजनांचा आढावा घेवून होणार मुल्यमापन.

प्रवीण खेते / अकोला : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचे मुल्यमापन नविन शैक्षणिक सत्रापासून बाह्य यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वान्वये बाह्य यंत्रणेमार्फत मुल्यमापन होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नविन शैक्षणिक सत्र २0१५-१६ पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेवून त्यांचे मुल्यमापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुल्यमापन योजनेसाठी मंत्रालयीन विभाग तसेच इतर क्षेत्रिय कार्यालये, विविध सामाजिक उपक्रमांशी संबंधीत कामाचा अनुभव असणार्‍या नोंदणीकृत संस्थांची निवड करण्यात करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजना केंद्रस्थानी ठेवून, या योजनांची पूर्तता कितपत केली जात आहे हे पाहणे, हा या बाह्य यंत्रणेचा मुळ उद्देश राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्ग, महिला व बालके आणि अपंग इत्यादींपर्यंत या योजनांचा लाभ किती प्रमाणात पोहचविण्यात येत आहे याचे ही यंत्रणा प्रामुख्याने मुल्यमापन करण्यात येणार आहे. यंत्रणेचे कामाचे स्वरूपच पाहता, योजनांचा नि:पक्षपाती आढावा घेणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य होणार आहे.

*अशी होईल बाह्य यंत्रणेची निवड

        मंत्रालयीन विभाग, इतर क्षेत्रिय कार्यालये, तसेच विविध सामाजिक उपक्रमांशी संबंधित कामाचा अनुभव असणार्‍या नोंदणीकृत संस्थांची निवड बाह्य यंत्रणेसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय व निमशासकीय यंत्रणेशी संबंधीत कामाचा अनुभव, कामाचा दर्जा, संस्थेचे मनुष्यबळ, तसेच शहरी व ग्रामीण भागात काम करण्याची क्षमता आदी निकष ठरविण्यात आले आहे.