शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार: महिला बचत गटांना डावलून एजन्सीला कंत्राट देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:05 IST

महिला बचत गटांना डावलून मर्जीतल्या एजन्सीला कंत्राट देण्याचा घाट रचल्या जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर टीकास्त्र सोडले.

अकोला: महापालिक ा तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना २०१९-२० च्या शालेय सत्रापासून केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी जारी केला. या आदेशात पात्र ठरणाऱ्या महिला बचत गटांनाही संधी देण्याचे आदेशात नमूद असताना महिला बचत गटांना डावलून मर्जीतल्या एजन्सीला कंत्राट देण्याचा घाट रचल्या जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर टीकास्त्र सोडले.महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने शालेय पोषण आहार पुरवठा सुरू केला. मनपाच्या स्तरावर दरवर्षी निविदा प्रक्रिया रावबून महिला बचत गटांना आहार पुरवठ्याचे कंत्राट दिले जाते. २०१९-२० या शालेय वर्षात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केला. मनपाच्या स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली जात असून, शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या आदेशात पात्र ठरणाºया महिला बचत गटांनाही कं त्राट दिला जाऊ शकतो. असे असताना सत्ताधारी भाजपच्या इशाºयानुसार प्रशासन काही मर्जीतल्या एजन्सीला कं त्राट देणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. निविदा अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, लवकरच करारनामा होऊन एजन्सीला कंत्राट दिला जाईल. महिला बचत गटांना डावलल्यास त्याचे गंभीर परिणाम सत्तापक्षासह प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा यावेळी साजिद खान यांनी दिला. यावेळी नगरसेवक इरफान खान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.महिला बचत गट एकत्र आल्यास अडचण काय?केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणालीचा कंत्राट बचत गटांना देता येतो. बचत गटांची क्षमता ओळखून त्यांनाही संधी देणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध महिला बचत गट एकत्र आल्यास प्रशासनाला अडचण काय, असा सवाल साजिद खान यांनी उपस्थित केला. बचत गटांना डावलल्यास प्रशासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे खान यांनी स्पष्ट केले.महिला सबलीकरणाच्या निव्वळ गप्पामहिलांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांचे दाखले दिले जातात. विविध कामांमध्ये महिला बचत गटांचे सहाय्य घेणाºया सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाकडून महिलांना डावलण्याचे धोरण आखण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला