शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी; विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST

अकाेला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक ...

अकाेला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता २५ एप्रिलऐवजी २३ मे रोजी होणार असून विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविल्यानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २५ एप्रिल रोजी होणार होती; मात्र शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २५ एप्रिलदरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. अभ्यासाकरिता आता आणखी काही दिवस मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. ती आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

असा करावा अर्ज

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाइटवर करावा. वेळापत्रक, माहिती पुस्तिका आणि अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे.

दहावी, बारावी परीक्षा व कोरोनाचे कारण

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली. आधी फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे हा परीक्षेसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे.

२५ एप्रिल रोजी नियोजित शिष्यवृत्ती परीक्षेकरिता बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्जच सादर झाले नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने विद्यार्थी व पालक गोंधळले आहेत.

२३ मे रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार की ऑफलाइन, असा प्रश्न शाळांचे मुख्याध्यापक व पालकांसमोर उपस्थित झाला आहे.