शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन रब्बीच्या तोंडावर खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची वाढणार डोकेदुखी, अकोला जिल्ह्यासाठी ७१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

By रवी दामोदर | Updated: September 27, 2022 14:05 IST

Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

- रवी दामोदर अकोला : खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्याची तब्बल ७१ हजार मेट्रिक टनाची मागणी असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२ हजार मेट्रिक टनच खत उपलब्ध आहे. त्यामळे आगामी दिवसांत शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये डीएपी मिळत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांमधून होत आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना डीएपीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला. आता ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२५१ मेट्रिक टन डीएपी उपलब्ध असल्याचे ऑनलाइन दिसून येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कृषी सेवा केंद्र चालक डीएपीचा तुटवडा असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ३१० मेट्रिक टन मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी ८५ हजार ९०५ मेट्रिक टन प्राप्त झाला आहे. रब्बी हंगाम २०२२-२३ करिता कृषी विभागाकडून ७१ हजार मेट्रिक टन मागणी असून, जिल्ह्यात केवळ १० हजार ते १२ हजार मेट्रिक टनच खतं उपलब्ध आहे. त्यापैकी डीएपी खत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

 हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार !जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढणार आहे. बहुतांश भाग खारपाणपट्टा असल्याने शेतकरी दरवर्षी हरभऱ्याला पसंती देतात. पश्चिम विदर्भातील अकोल्यासह, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी पेरणीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. मात्र, खत टंचाई असल्याने शेतकऱ्यांची ऐनवेळी धावाधाव होणार आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती