शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘से नो टू प्लास्टिक’ : जनजागृतीसाठी धावले अकोलेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:36 IST

अकोला: प्लास्टिकचा वापर टाळण्याकरिता या थिमवर आधारित यंदाची वॉकेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

अकोला: प्लास्टिकचा वापर टाळण्याकरिता या थिमवर आधारित यंदाची वॉकेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.आयएमए वॉकेथॉन ही सार्वजनिक जनजागृती रॅली आहे. समाजाला चालण्याच्या सवयीचे फायदे लक्षात आणून देणे, ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी असल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेचे अकरावे वर्ष होते. स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. १०, ६ आणि ३ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत ६ ते ६५ वर्षांवरील स्त्री-पुरुष नागरिकांनी सहभाग घेतला. ‘वा रे अकोला’ आणि ‘बिनधास्त बंदे’ या दोन वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये स्पर्धकांनी प्लास्टिक बंदी या विषयावर वेशभूषा व स्लोगन तयार केले. चिमुकल्यांनी सैनिक, मिस वर्ल्डच्या वेशभूषा साकारू न प्लास्टिक वापर टाळावा, असा संदेश दिला. वॉकेथॉन स्पर्धेला आयएमए हॉल येथून सुरुवात झाली. स्पर्धेचा समारोप वसंत देसाई क्रीडांगण येथे करण्यात आला.स्पर्धेचा समारोपस्पर्धेचा समारोप खासदार अ‍ॅड़ संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सृदृढ आरोग्याचा संदेश देणारी वॉकेथॉन ही एक चळवळ असून, ही मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावा-गावांत पोहोचावी, अशी अपेक्षा यावेळी खासदार धोत्रे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, चित्रपट निर्माते डॉ. दीपक मोरे, अभिनेता अमित्रियान पाटील यांची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमात वॉकेथॉनमध्ये सहभागी तीन वयस्कर धावकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पृथ्वीराज विज, रत्नकुमार वालचाळे, अशोक देशमुख यांचा सहभाग होता. उत्कृष्ट वेशभूषाबद्दल वीरश्री राठोड, केतकी दंदे यांना सन्मानित करण्यात आले. वॉकेथॉन सहभागी जसनागरा ग्रुप, गार्गी भगत, ब्ल्यू मॅनमॉर क्लब, आसूड ग्रुप, पिंकथॉन ग्रुपला ‘वा रे अकोला’ उपक्रमांतर्गत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील