मूर्तिजापूर: तालुक्यातील दापुरा गट ग्रामपंचायतमध्ये आयोजित ग्रामसभेला सुरुवात होण्यापूर्वीच सरपंच संगीता पाथरे यांनी काढता पाय घेतला. त्यांच्या या कृत्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेतच त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित केला. मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा गट ग्रामपंचायत येथे २८ मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतमधील शिरसाळा, ताकवाडा, दापुरा, गुंजवाडा, येथील ग्रामस्थ सभेसाठी हजर होऊ लागले. सभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वार्षिक खर्चाचा हिशेब मागण्यास सुरुवात होईल, अशी जाणीव सरपंच संगीता पाथरे यांना झाली आणि त्यांनी लागलीच सभेतून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला.
सरपंचाचे ग्रामसभेतून पलायन
By admin | Updated: June 1, 2014 22:38 IST