शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच सर्मथकांचा पोलिसांवर हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 02:11 IST

अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी सदस्यांनाही मारहाण!

बुलडाणा: तालुक्यातील नांद्राकोळीचे सरपंच यांच्यावरील अविश्वास प्रस्तावसाठी ९ मार्च रोजी दुपारी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सहभागी होण्यासाठी क्रुझर जीपने ८ ग्रामपंचायत सदस्य पोहोचले असता, सरपंच सर्मथकांनी जीपवर हल्ला करुन आत बसलेल्या ग्रा.पं.सदस्यांना मारहाण केली. जिपच्या काचा फोडल्या, तसेच तेथे तैनात पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी सुधाकर काळे जखमी झाले आहेत.तालुक्यातील नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य असून, सदस्यांनी डॉ.हरिदास रामकृष्ण काळवाघे यांना सरपंच म्हणून निवडले; मात्र सरपंच काळवाघे अन्य ग्रा.पं.सदस्यांना विश्‍वासात न घेता, मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत नांद्राकोळी येथील १0 ग्रा.पं.सदस्यांनी बुलडाणा तहसीलदार यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव सदर केला होता, यानुसार तहसीलदार बाजड यांनी अविश्‍वास प्रस्तावावर चर्चेसाठी ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले. निर्धारित वेळेच्या १0 मिनिटाआधी या सभेत सहभागी होण्यासाठी एमएच २८ वी ६१६७ क्रमांकाच्या क्रुझर जिपने ८ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भवनात पोहोचले. त्यावेळी तेथे उपस्थित सरपंच सर्मथकांनी जिपवर हल्ला करुन आत बसलेल्या ग्रा.पं.सदस्यांना मारहाण करणे सुरु केले. बचावासाठी पोलीस कर्मचारी धावले असता, त्यांनाही सर्मथकांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस पथकासह गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.