शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाचा पंचायत समिती कार्यालयात आत्महदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले डिझेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 20:00 IST

Sarpanch attempts self imolation सरपंच किशोर नाईक यांनी ९ नोव्हेंबर रोजी पंचायत विभागात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देकृती आराखडा पाठविण्यासाठी पंचायत समितीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप उपस्थितीत नागरीकांच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम पोही येथील विकास कामांसंदर्भात पंचायत समितीला जिल्हा परिषदकडे कृती आराखडा पाठविण्यासाठी येथील सरपंच किशोर नाईक यांनी वारंवार विनंती करूनही सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी विस्तार अधिकारी बी. पी. पजई यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली, असा आराेप करत सरपंच किशोर नाईक यांनी ९ नोव्हेंबर रोजी ५ वाजताच्या दरम्यान पंचायत विभागात अंगावर डीझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

             रोहणा बॅरेज या प्रकल्पात पोही येथील अनेक शेतकऱ्यांची शेती गेली आहे. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. गावाचे पुनर्वसन करायचे असल्याचे कारण पुढे करून या गावाचा विकास कृती आराखडा पाठविण्यास पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी (पंचायत) बी. पी. पजई हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सरपंच किशोर नाईक यांनी केला आहे. शासनाने अत्यावश्यक

विकास कामे थांबविता येणार नसल्याचे २६ में २००५ रोजी एका परिपत्रकात नमूद केले आहे. तरीसुद्धा या गावाचे नाव विकास कृती आराखड्यातून वगळण्यात आले होते. यासाठी सरपंच किशोर नाईक यांनी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांना व विस्तार अधिकारी पजई यांना वारंवार विनंती केली असता, विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात येत आहे. यासाठी विस्तार अधिकारी पजई यांनी अनेक अटी समोर केल्या. विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी व पाठबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्यासाठी वेठीस धरले, तेही प्रमाणपत्र सरपंचांनी विस्तार अधिकाऱ्याकडे सादर केले, तरीही आराखडा जिल्हा परिषद अकोला यांना पाठविण्यात येत नसल्याने गावाचा विकास थांबला आहे, त्यामुळे कंटाळून टोकाची भूमिका घ्यावी लागल्याचे सरपंच किशोर नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 यासंदर्भात उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन मागीतले त्यांनी केलेल्या मार्गदर्शनात्यानुसार २६ मे २००५ च्या परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येऊन सदर प्रस्ताव आजच जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येत आहे, मी दोन दिवसांपूर्वीच रुजू झाल्याने या प्रकरणी अनभिज्ञ होतो. यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही.- बालासाहेब बायसगटविकास अधिकारी, पंचायत समिती, मूर्तिजापूर सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला होता. यावर त्यांनी उपजिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याकडे मार्गदर्शन मागीतले व यासाठी परवानगी दिली. हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला असून सुट्टी असल्याने तो पाठविता आला नाही.- बी. पी. पजईविस्तार अधिकारी, (पंचायत)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर