शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार: युवतीला दिले मुदतबाहय़ औषध!

By admin | Updated: August 18, 2016 02:11 IST

अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ, युवतीची प्रकृती बिघडली.

अकोला, दि. १७ : सर्वोपचार रुग्णालयामध्ये येणार्‍या गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयातील ज्या डॉक्टरने वृद्ध महिलेवर शस्त्रक्रिया केली, त्यानेच ती शस्त्रक्रिया चुकीची ठरविली. आता सर्वोपचार रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी गेलेल्या युवतीला एका महिला डॉक्टरने दोन महिन्यापूर्वीच मुदत संपलेले औषध दिले. त्यामुळे युवतीला डोके दुखण्यासोबतच चक्कर आल्याचा त्रास सुरू झाला. या घटनेवरून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर जीवघेणे प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. पातूर येथे राहणारी भूमिका दामोदर राऊत ही युवती कान दुखत असल्याने, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात गेली. रीतसर पावती घेऊन ती ओपीडी क्रमांक ३४ मध्ये गेली. याठिकाणी महिला डॉक्टरने भूमिकाची तपासणी केली आणि तिला कानात औषध टाकण्यासाठी महिला डॉक्टरने स्वत:कडील ह्यओटोबायोटिकह्ण नावाचा ड्रॉप दिला. भूमिका उपचार व औषध घेतल्यानंतर घरी परतली. तिने महिला डॉक्टरने दिलेली औषध कानात टाकले; परंतु तिला बरे वाटण्याऐवजी डोके दुखायला लागले आणि चक्कर यायल्या लागल्यात. तसेच तिला फिट यायला सुरुवात झाली. झालेल्या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून गेले. तिला लगतच्या डॉक्टरकडे नेले असता, त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील महिला डॉक्टरने दिलेले औषध तपासले असता, ते मुदतबाहय़ असल्याचे दिसून आले. भूमिका राऊत हिने यासंबंधीची तक्रार अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे केली. मुदतबाहय़ औषध दिल्यामुळे जीवाचे काही बरेवाईट झाले असते, तर कोण जबाबदार ठरले असते, असा प्रश्न भूमिका राऊत हिने उपस्थित केला. तिने महिला डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली. महिला डॉक्टरने औषध देण्यापूर्वी ते मुदतबाहय़ आहे किंवा नाही, याची तपासणीसुद्धा केली नाही. यावरून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांविषयी किती निष्काळजी आहेत, हे स्पष्ट होते. दिलेले औषध सर्वोपचारमधील नसल्याचा दावा!भूमिका राऊत हिला दिलेले 'ओटोबायोटिक' औषध सर्वोपचार रुग्णालयातील औषध भांडार विभागातील नसल्याचा दावा केला जात आहे. औषध भांडार विभागामध्ये कानासाठी ह्यसिरीकेईनह्ण नावाच्या औषधांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे युवतीला दिलेले औषध भांडार विभागाकडून दिलेलेच नाही, असा दावा तेथील कर्मचार्‍यांनी केला आहे. आमच्याकडून दिलेल्या औषधांवर ह्यगव्हर्मेंट सप्लाय, नॉट फॉर सेलह्ण असे लिहिलेले असते. युवतीकडे असलेल्या औषधीवर ह्यफिजिशियन सॅम्पलह्ण असे लिहिले आहे. ह्यसर्वोपचारह्णमधील औषध भांडाराचे होते ऑडिटसर्वोपचार रुग्णालयातील औषध भांडाराचे तीनदा ऑडिट होते. महालेखापाल नागपूर हे वर्षातून एकदा औषध भांडाराचे ऑडिट करतात. दुसरे ऑडिट हे लेखा व कोषागार विभागाकडून दर पाच वर्षांनी करण्यात येते आणि तिसरे ऑडिट हे औषध भांडार विभागाचे कर्मचारी महिन्यातून एकदा करतात, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.मी केलेल्या चौकशीनुसार युवतीला दिलेले मुदतबाहय़ औषध हे आमच्या रुग्णालयातील नाही. युवतीकडे असलेले औषध हे वैद्यकीय प्रतिनिधीकडील आहे. युवतीला हे मुदतबाहय़ औषध कोणी दिले, याबाबत आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू.डॉ. राजेश कार्यकर्तेअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय