शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पालखी निघाली..,भक्तासंगे गजानन माऊली निघाली; श्रींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन

By नितिन गव्हाळे | Updated: June 13, 2024 22:42 IST

श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात राहील. भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

अकोला : भजनी मंडळ, टाकळकरी, दिंडी, अश्व व ७०० वारकऱ्यांसह शेगाव येथून संत श्री गजानन महाराजांच्या पालखी १३ जून रोजी दुपारी निघाली असून, ही पालखी नागझरी येथे पोहोचली असून, तेथून पालखी अकोला जिल्ह्यातील पारस येथे दाखल होईल. तेथून भौरद येथे १४ जूपन रोजी मुक्काम करून श्रींच्या पालखीचे शनिवार, १५ जून रोजी सकाळी ७:०० वाजता राजराजेश्वरनगरात आगमन होणार आहे.

श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात राहील. भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १५ जून रोजी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय ग्राउंडवर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था आहे.

...असा राहील शोभायात्रेचा मार्ग

१५ जून रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा खालीलप्रमाणे निघणार आहे. सकाळी ११:०० वाजता श्रींचे पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघेल. डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्माई मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार येथून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण येथे पालखीचा मुक्काम राहील.रविवारी हरिहरपेठेत मुक्काम

१६ जून २०२४ रोजी परतीचा मार्ग सकाळी ६:०० वाजता जिल्हाधिकारी निवासमोरून, वन विभाग कार्यालय, खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरणानंतर संभाजीनगर, सिंधी कॅम्प मेन रोड,कारागृह समोरून, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहतील.