शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८ ‘अ’ नसल्याने लाभार्थी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:31 IST

प्लॉट घेण्यासाठी केवळ ५० हजारांची मदत

ठळक मुद्देघरकुल योजना

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मालकी हक्क असलेला शासकीय दस्तावेज ८ ‘अ’ नसल्याने हजारो अतिक्रमक घरकुलापासून वंचित राहणार आहेत.केंद्र शासनाच्या योजनेसाठी घरकुल लाभार्थींकडे शासकीय दस्तावेज ८ अ हा महत्त्वाचा आहे. गेल्या ४० वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहणाºया जागेत टुमदार घरकुल शासनाच्या योजनेतून घेण्यासाठी धडपडणाºया लाभार्थीला जागा मालकी हक्क नसल्याने वंचित राहावे लागत आहे. त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या दीनदयाल योजनेतून अल्पशा ५० हजार रुपयांत खासगी जागा खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. लाभार्थी ४०-५० वर्षांपासून शासकीय गावठाणावर झोपडे बांधून राहत आहेत. त्या जागेचा ग्रामपंचायत, नगर परिषदेला घराचा कर भरणा करतात. त्या जागेत नळ, वीज पुरवठासुद्धा आहे. अतिक्रमणाची दंडात्मक कार्यवाही पूर्ण झाली. नियमानुकूल झाल्यानंतर गावठाण जागा मात्र भोगवटादार म्हणून शासन, ग्रा.पं. येत आहे. लाभार्थींचे नाव येत नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना तालुक्यातील बेघर पात्र लाभार्थींना प्रत्येक गावात जागा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. गावामध्ये गावालगत शासकीय जमीन उपलब्ध आहे का, शासनाच्या गावठाण विस्तार योजनेंतर्गत भूखंड असल्यास लाभार्थीला लाभ द्यावा, नसल्यास लाभार्थीला पंडित दीनदयाल योजनेतून खासगी जमीन खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये देण्यात यावे; परंतु एवढ्या कमी अनुदानात लाभार्थीला खासगी जमीन (प्लॉट) मिळत नाही. नियमानुकूल जागेवर केवळ मालकी हक्काचा शासकीय दस्तावेज ८ अ नसल्याने त्यांच्यावर घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २०११ चे सर्वेक्षण विचारात घेऊन सर्व लाभार्थी पात्र याद्या संगणकाद्वारे प्रसिद्ध केल्या. ओबीसी व मागावसर्गीय प्रवर्गासाठी लक्ष्यांकानुसार वाटप करण्यात आले. यामध्ये मालकी जागेची अट महत्त्वाची आहे. मालकी हक्काचा शासकीय दस्तावेज नसल्यास त्या लाभार्थीला वगळून पुढील पात्र लाभार्थीला लाभ देण्यात येत आहे.जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपलीनमुना ८ अ नसल्याने बाळापूर शहर व ६६ ग्रामपंचायतींमधील हजारो पात्र लाभार्थींना मालकी हक्काच्या शासकीय दस्तावेजामुळे वंचित राहावे लागत आहे. याबाबत घरकुल लाभार्थींनी निवेदने दिलीत; परंतु ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांनी मात्र घरकुल लाभार्थींना जागा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्राला कचºयाची पेटी दाखवून अतिक्रमक पात्र लाभार्थींना वंचित ठेवण्यात आले.शासनाने खासगी प्लॉट खरेदी करण्यासाठी दीनदयाल योजनेच्या माध्यमातून ५० हजारांचे अनुदान देण्यासाठी तालुक्यातून एकही लाभार्थी नाही. खासगी प्लॉटच्या किमती वाढल्याने  लाभार्थींनी या योजनेचा कुठलाही लाभ घेतला नाही. शासनाने ५० हजारांऐवजी एक लाख रुपये अनुदान वाढविल्यास लाभार्थींना योजनेचा लाभ घेता येईल.- वाय. डी. शिंदे,गटविकास अधिकारी, पं.स. बाळापूर.

शासनाने घरकुल योजनेत वेगवेगळे निकष लावून पंतप्रधान आवास योजनेत पात्र लाभार्थींना मालकी हक्क असलेल्या ८ ‘अ’ची अट काढावी अथवा शासकीय जमीन देऊन पात्र  लाभार्थीला घरकुलाचा लाभ द्यावा.- निरंजन सिरसाट,माजी सभापती, पं. स. बाळापूर.