शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

‘स्वच्छता मिशन’ची ‘ऐसीतैशी’

By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST

कच-याचे ढीग आणि दुर्गंधीने अकोलावासी हैरान.

संतोष येलकर/अकोलादेशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत असले तरी, अकोला शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला साचलेले कचर्‍याचे ढीग आणि दुर्गंधीने शहरवासी हैरान झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता मिशनची शहरात ऐसीतैशी होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गेल्या २ ऑक्टोबरपासून देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. त्यानुषंगाने सर्वत्र स्वच्छता मिशनची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्वच्छतेच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. सगळीकडे स्वच्छतेचा बोलबाला सुरू असताना अकोल्यात मात्र, विविध भागात रस्त्यांवर आणि रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचल्याचे वास्तव रविवारी दिसून आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते टॉवर चौक, भाजी बाजार, बस स्थानकामागील परिसर, फतेह चौक ते दीपक चौक, आकोट स्टॅन्ड व इतर भागात रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले असून, हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. वार्‍याच्या सुसाट्यात रस्त्यांवरून कचरा उडत आहे. उडणारा कचरा डोळ्यात जात आहे. तसेच भाजी बाजार, शासकीय विश्रामगृह समोर व बस स्थानकामागील परिसरात रस्त्यांवर सडका भाजीपाला, हिरव्या नारळाची टरफले, प्लास्टिक पिशव्या, पृष्ठ आणि कागदाचे तुकडे व काडीकचरा कुजत असून, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतर भागातही असेच असाच अनुभव येत असून, कचर्‍याच्या ढिगांसोबतच मोकाट जनावरांचा मुक्त संचारही सर्रास सुरू आहे. कचर्‍याच्या समस्येने नागरिक हैरान असून, यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ते बघता स्वच्छता मिशनचा अकोल्यात बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे.