अकोला : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा महिला संपर्क प्रमुख म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या संध्या देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर नियुक्ती करण्यात आली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘बाबा ते बाबा’ प्रबोधन पंधरवडा कार्यक्रमास जिल्हा भरात मोठा प्रतिसाद लाभत आहे. महिला उद्बोधनाकरिता ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जन्मोत्सव १२ जानेवारीपर्यंत महिलांकरिता प्रबोधन कार्यक्रम राबवून सर्व तालुक्यात अंनिसचे महिला संघटन मजबूत करणार असल्याचे संध्या देशमुख यांनी सांगितले.बैठकीस महानगर संघटक चंद्रकांत झटाले, कार्याध्यक्ष धम्मदीप इंगळे, अॅड. शेषराव गव्हाळे, हरीश आवारे, भारत इंगोले, मंगेश वानखडे, आशा उगवेकर, श्यामभाऊ देशमुख, विजय बुरकले, विकास मस्के, अॅड. अनिल लव्हाळे व कौशिक पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला संपर्क प्रमुखपदी संध्या देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:48 IST
अकोला : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा महिला संपर्क प्रमुख म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या संध्या देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला संपर्क प्रमुखपदी संध्या देशमुख
ठळक मुद्देअखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर नियुक्ती करण्यात आली.प्रबोधन कार्यक्रम राबवून सर्व तालुक्यात अंनिसचे महिला संघटन मजबूत करणार असल्याचे संध्या देशमुख यांनी सांगितले.