शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या लगबगीत वाळू माफियांची चांदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:19 IST

अकोला: जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या लगबगीत वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया स्वत:ची चांदी करून घेत असताना, त्याकडे मात्र महसूल प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.यावर्षी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ५८ वाळू घाटांचा लिलाव प्रस्तावित आहे. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला आहे, तर शासकीय यंत्रणांच्या कामांसाठी नऊ वाळू घाट राखीव ठेवण्यात आले आहेत. लिलाव करण्यात आलेल्या ११ वाळू घाटांतून संबंधित लिलावधारकाकडून वाळूचा उपसा अद्याप सुरू करण्यात आला नसला, तरी जिल्ह्यातील सर्वच वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक करून वाळू विक्रीचा गोरखधंदा वाळू माफियांकडून जोरात सुरू आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, वाळू घाटांमध्ये अवैध उत्खनन, अवैध वाहतूक आणि अवैध वाळू विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया स्वत:ची चांदी करून घेण्यात गुंतले असताना, या प्रकाराकडे जिल्हा महसूल प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.लिलाव करण्यात आलेलेअसे आहेत ११ वाळू घाट!अकोला तालुका : ब्रम्हपुरी, टाकळी पोटे, एकलारा, रोहणा, कपिलेश्वर, दहीहांडा.अकोट तालुका : भोड, खिरकुंड बु., केळीवेळी.पातूर तालुका : तुलंगा खुर्द.मूर्तिजापूर तालुका : लाखपुरी.शासनाच्या महसुलास चुना!जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने, वाळू घाटांच्या लिलावातून शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या महसुलास चुना लागत आहे. दुसरीकडे वाळू माफियांची मात्र चांदी होत आहे.पाच कोटींचामहसूल बुडणार?गतवर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावातून ७ कोटी ५६ लाख रुपयांचा महसूल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. यावर्षी ११ वाळू घाटांच्या लिलावातून केवळ २ कोटी ४७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याने, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाळू घाटांच्या लिलवातून मिळणारा ५ कोटी ९ लाख रुपयांचा महसूल बुडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.कारवाईकडे कानाडोळा !जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन, अवैध वाहतूक जोरात सुरू असताना, यासंदर्भात कारवाई करण्याच्या कामाकडे जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, त्याद्वारे २ कोटी ४६ लाख ५७ हजार ७३२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नऊ वाळू घाट शासकीय यंत्रणांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू