शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांची बांधकामे ग्रामपंचायतींना देण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:22 IST

ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध ६ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती आणि नवीन बांधकामे ग्रामपंचायतींना देण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९...२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती व नवीन बांधकामे करण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला ६ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती आणि नवीन बांधकामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाऐवजी जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडून करण्यासाठी कामांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा ठराव समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षण व वैयक्तिक लाभाच्या योजना आणि साहित्य खरेदीसाठी अटी व शर्तींच्या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

तीन योजनांसाठी लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ!जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत सेस फंडातून ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन, सायकल व पिको फॉल मशीन या तीन योजनांसाठी जिल्ह्यातील लाभार्थींकडून पंचायत समिती स्तरावर अर्ज स्वीकारण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे समितीची पहिली सभा!कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण समितीची पहिली सभा शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आली. जिल्ह्यातील तालुका स्तरावरील ‘सीडीपीओ’ कार्यालयातून समितीच्या सदस्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे समितीच्या सभेत सहभाग घेतला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद