शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यतेमध्ये दोन लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार लिकिंगच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:02 IST

आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे१६ ऑक्टोबरपर्यंत मुदततर शिक्षकांवर अतिरिक्तचे संकट

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: २0१७ व १८ या वर्षाच्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक अपलोड करावे लागत आहे. आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे. संचमान्यतेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे आधार लिकिंग होत नसल्याने दरवर्षी अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येते. पुढीलवर्षी सुद्धा हे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, मनपा, न.प. सह खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने, शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यातही शासनाने यातील गैरप्रकार रोखण्यासाठी संचमान्यतेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या माहितीसह त्यांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य केले आहे. परंतु संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचा, वर्गाचा समावेश करताना, शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अतिरिक्त ठरण्याची वेळ आपल्यावर येवू यासाठी दृष्टीकोनातून शिक्षक धावपळ करून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिळवून, त्यांचे क्रमांक संचमान्यतेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातही वर्गांंमधील अध्र्याधिक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने, संचमान्यतेमध्ये त्यांचा समावेश करावा तरी कसा? असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एका वर्गातील अध्र्याधिक विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड, त्याचा क्रमांक संचमान्यतेमध्ये समाविष्ट केला नाहीतर शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येत आहे. यावर्षी सुद्धा अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांंच्या संख्येअभावी अतिरिक्त ठरावे लागले. २0१७ व १८ च्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांंचा समावेश करण्यासाठी शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबरपर्यंंत वेळ दिली आहे.

संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांंची आधार लिंकिंग महत्वाची आहे. त्यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंंत वेळ आहे. शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांंचा संचमान्यतेमध्ये समावेश करावा आणि पुढील वर्षी होणारी गैरसोय टाळावी. - प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जि.प. अकोला