शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील रस्ते कामांच्या नमुन्यांची होणार ‘इन कॅमेरा’ तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:51 IST

अकोला : रस्ते कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असून, व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात (इन कॅमेरा) नमुन्यांची तपासणी होणार आहे.

ठळक मुद्देशहरातील रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले. घेण्यात आलेले नमुने सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. नमुने तपासणीच्या कामाचे व्हिडिओ कमेराद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले. सहा दिवसांत सहा रस्ते कामांचे ७६ नमुने घेण्यात आले असून, घेण्यात आलेले नमुने सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. रस्ते कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असून, व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात (इन कॅमेरा) नमुन्यांची तपासणी होणार आहे.शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम २२ जुलैपासून सुरू करण्यात आले. नमुने घेण्याचे काम शुक्रवार, २७ जुलै रोजी पूर्ण करण्यात आले. सहा दिवसांत शहरातील रस्ते कामांचे तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७६ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत संबंधित तज्ज्ञांच्या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. नमुने तपासणीच्या कामाचे व्हिडिओ कमेराद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.‘या’ रस्ते कामांचे घेतले नमुने!

-मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक.-टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक .-अग्रसेन चौक ते दुर्गा चौक .-माळीपुरा ते मोहता मिल चौक .-अशोक वाटिका ते सरकारी बगीचा.-गोरक्षण रोड (नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालयपर्यंत)शहरातील रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले. तीन पथकांमार्फत सहा रस्ते कामांचे ७६ नमुने घेण्यात आले असून, ते सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. घेण्यात आलेल्या नमुन्यांची तज्ज्ञांमार्फत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात तपासणीचे काम करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका