शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी, दाभोळकर हत्येसाठी वापरलेली ‘मोडस आॅपरेंडी’ एकच - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:44 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप तुषार गांधी यांनी केला.

ठळक मुद्दे ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही.इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोडस आॅपरेंडीच नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या स्तरावर टीम तयार करून या हत्या घडविण्यात आल्या. त्यामुळेच या हत्यामागे ज्या संस्थांची प्रेरणा अन् प्रोत्साहन होते तिथपर्यंत थेट पोहचता येत नाही, अशी खंत व्यक्त करून त्याचाच फायदा अशा हत्यामध्ये सहभागी संस्था घेत असून, ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.महात्मा गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात गांधी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे उपस्थित होते. तुषार गांधी पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप त्यांनी केला. गांधी हत्येनंतर कोर्टात खटला उभा राहिल्यावर पुराव्याअभावी या काहींची सुटका झाली असली तरी पुरावे कोर्टासमोर उपलब्ध होणार नाहीत असेच षडयंत्र या मागे रचले गेले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन ‘ते’ आम्ही नव्हेच अशा सांगणाऱ्या संस्था निर्दोषत्व सांगत असल्या तरी त्यांचीच प्रेरणा या हत्येमागे होती हे सिद्ध करण्यास कपूर आयोग महत्त्वाच ठरतो, असे ते म्हणाले. गांधी हत्येप्रमाणेच दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे यावर ज्यांचा विश्वास नाही अशा संस्थांचा या मध्ये सहभाग होता; मात्र हत्येसाठी वेगवेगळ्या पातळीवर नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही. मुंबईचा डॉन दाऊद इब्राहीमसुद्धा अशाच मोडस आॅपरेंडीमुळे पोलिसांच्या हाती लागला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.महात्मा गांधींनी या देशाला वैचारिक लढा लढण्याची ताकद दिली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एखादे आंदोलन पुकारले की सर्व नेत्यांना अटक केली जात असे; मात्र जनता आंदोलनात कायम राहत गेल्याने स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला यामागे महात्मा गांधींनी दिलेला विचार होता, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी सोबतच कस्तुरबा गांधी यांचेही योगदान तेवढेच तुल्यबळ आहे; मात्र इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रख्यात कवी विठ्ठल वाघ, महादेवराव भुईभार, विजय विल्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तुषार गांधी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. संचालन चंद्रकांत झटाले यांनी केले. तर प्राचार्य डॉ. भीसे यांनी आभार मानले.

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ