शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात आसारामच्या आश्रमात संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:20 IST

अकोला : अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोल्यातील आसाराम बापूच्या आश्रमात तोडफोड केली. मुलींवर अत्याचार करणारा आसारामचा आश्रम अकोल्यातून हटविण्याची मागणी, या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देआश्रम अकोल्यातून हटविण्यासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोल्यातील आसाराम बापूच्या आश्रमात तोडफोड केली. मुलींवर अत्याचार करणारा आसारामचा आश्रम अकोल्यातून हटविण्याची मागणी, या आंदोलनाद्वारे करण्यात आली.आसाराम बापूच्या आश्रमात मुलींवर अत्याचार होत असल्याचा आरोप गत १५ वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडने केला होता. त्यानंतर २00४ मध्येच अकोल्यातील आसाराम बापूच्या कार्यक्रमात आसाराम बापू हा बलात्कारी असल्याचे पत्रक संभाजी ब्रिगेडकडून वाटप करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेडने गत १५ वर्षांपासून आसारामच्या विरोधात दंड थोपटले असून, त्याचे आश्रम तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील आसाराम बापूच्या आश्रमांची सखोल तपासणी करून, हे आश्रम बंद करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने बुधवारी केलेल्या आंदोलनाद्वारे केली आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी पातूर रोडवरील आश्रमावर धडक देऊन या ठिकाणचे फलक फाडले, त्यानंतर आसारामच्या प्रतिमांची तोडफोड करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रेम गावंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आसारामला शिक्षा सुनावताच राज्यभरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र अकोल्यातील पदाधिकार्‍यांनी आश्रमावरील साहित्याची तोडफोड करून, हा आश्रम अकोल्यातून हटविण्याची मागणी केली. या तोडफोडीची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन पडघन यांनी पोलिसांसह धाव घेतली. त्यानंतर या ठिकाणची तोडफोड थांबविण्यात आली. या संदर्भात वृत्तलिहेपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडAkolaअकोला