शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्षारयुक्त पाणी उठले जीवावर: चतारी येथे किडणीच्या आजाराने आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:24 IST

निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या.

ठळक मुद्दे निलेश यांना पाच वर्षापूर्वी किडणीचा आजार जडला होता. मुंबई, पुणे व नागपूर येथील रुग्णालयांमध्ये निलेशवर उपचार करण्यात आले. गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अकोला : पातूर तालुक्यातील चतारी येथे गेल्या दहा वर्षांपासून किडनीच्या आजाराने थैमान घातले आहे. क्षारयुक्त पाणी येथील ग्रामस्थांच्या जीवावर उठले असून, दहा वर्षात २० जणांचा मृत्यू झाला तर गावातील २० ते २५ ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. किडणीच्या विकारानेग्रस्त असलेल्या चतारी येथील आणखी एका युवकाचा गुरुवारी उपचारादरम्यान अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. अत्यंत हलाखीची परिस्थीत असलेल्या निलेश यांना पाच वर्षापूर्वी किडणीचा आजार जडला होता. या दरम्यान नसतानाही मुंबई, पुणे व नागपूर येथील रुग्णालयांमध्ये निलेशवर उपचार करण्यात आले. ऐपत नसतानाही लाखो रुपये उपचारावर खर्च झाले; परंतु कोणताही फरक पडला नाही. अखेर गत काही दिवसांपासून निलेश यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, व आईवडील असा परिवार आहे.दहा वर्षात २० जणांचा किडणी विकाराने मृत्यूखारपाणपट्ट्यात येत असलेल्या चतारी येथे ग्रामपंचायतच्या योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. तुलंगा परिसरात असलेल्या एका विहिरीतील पाणी गावातील जलकुंभात साठवून ते ग्रामस्थांना वितरीत करण्यात येते. १० वर्षांपूर्वी या गावात किडनीच्या आजाराची लागण झाली. पोलीस पाटील विजय सरदार यांनी पाठपुरावा केल्यानंतर विहिरीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. या पाण्यात सिलीका आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने पिण्यासाठी वापरू नये, असा अहवाल नागपुरातील प्रयोगशाळेने दिला. तरीही दहा वर्षांपासून या गावात प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे २० ग्रामस्थांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला तर २० ते २५ जण महागडा उपचार करीत आहेत. गावात कुठेही कुपनलीका खोदल्यास क्षारयुक्त पाणी असल्याने ग्रामस्थांवर विहिरीच्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य