शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बीटी बियाण्यांच्या १८ हजार पॅकेट्सची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:43 IST

अकोला : पेरणीपूर्वी जूनच्या सुरुवातीला कंपन्यांनी केलेल्या साठ्यातून घेतलेले बीटी कापूस बियाण्यांचे नमुने तपासणीत निकृष्ट निघाले. तिन्ही कंपन्यांच्या बियाण्यांच्या त्या लॉटमध्ये असलेल्या १८०८१ पॅकेट्स बियाण्यांची विक्री राज्यातील शेतकऱ्यांना झाली.

ठळक मुद्दे९ हजार ४० एकर शेतीवर त्या बियाण्यांची पेरणी झाली असून, त्या क्षेत्रावर बोंडअळीचा धोका घोंगावत आहे. विक्री झालेल्या सर्वाधिक पॅकेट्स सत्त्या अ‍ॅग्रोचे ७४८५, राशी सीड्सचे ६८१६, तर तुलसी सीड्सच्या ३७८० पॅकेट्सचा समावेश आहे. तुलसी सीड्सच्या तुलसी -११८ बीजी-२ वाणाच्या लॉट क्रमांक ४५२२० मध्ये ते प्रमाण केवळ ५७ टक्के आढळले आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : पेरणीपूर्वी जूनच्या सुरुवातीला कंपन्यांनी केलेल्या साठ्यातून घेतलेले बीटी कापूस बियाण्यांचे नमुने तपासणीत निकृष्ट निघाले. तिन्ही कंपन्यांच्या बियाण्यांच्या त्या लॉटमध्ये असलेल्या १८०८१ पॅकेट्स बियाण्यांची विक्री राज्यातील शेतकऱ्यांना झाली. ९ हजार ४० एकर शेतीवर त्या बियाण्यांची पेरणी झाली असून, त्या क्षेत्रावर बोंडअळीचा धोका घोंगावत आहे. विक्री झालेल्या सर्वाधिक पॅकेट्स सत्त्या अ‍ॅग्रोचे ७४८५, राशी सीड्सचे ६८१६, तर तुलसी सीड्सच्या ३७८० पॅकेट्सचा समावेश आहे.गेल्यावर्षी झालेल्या बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक मेटाकुटीस आला असताना यावर्षीही हजारो एकरावर बोंडअळीला पोषक बीटी बियाण्यांची पेरणी झाल्याचे पुढे येत आहे. चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवालात बीटी कापूस बियाण्यांत (नॉन-बीटी) रेफ्युजीचे प्रमाण ठरल्यापेक्षा कमी आढळले, तर दोन कंपन्यांच्या बियाण्यांत बीटी जिन्सचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा आहे. बीटी कापूस बियाण्यासोबत दिले जाणारे रेफ्युजी बियाणे शंभर टक्के नॉन-बिटी द्यावेच लागते. राशी सीड्सच्या आरसीएच-१३८ वाणाच्या लॉट क्रमांक-७५२५३ मध्ये बीटी बियाणे असल्याचे पुढे आले. त्यामध्ये बीजी-१ चे प्रमाण नऊ टक्के तर बीजी-२ चे प्रमाण ३२ टक्के आहे. नमुने घेतल्याच्या दिवशी म्हणजे ६ जून रोजी या कंपनीचा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा होता. त्यामुळे या बियाण्यांतून येणाºया पिकावर बोंडअळीची शक्यता वाढलेली आहे.कापूस बियाण्यात बीटी जिन्सचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असणे आवश्यक आहे. तुलसी सीड्सच्या तुलसी -११८ बीजी-२ वाणाच्या लॉट क्रमांक ४५२२० मध्ये ते प्रमाण केवळ ५७ टक्के आढळले आहे. श्री सत्त्या अ‍ॅग्रोबायोटेकच्या एसएससीएच-५५५ बीजी-२ या वाणाच्या लॉट क्रमांक ३०३-३१०४५ मध्ये बीजी-२ जिन्सचे प्रमाण केवळ ३७ टक्के आहे. याच कंपनीच्या ४५ एसएस-३३ बीजी-२ वाणाच्या लॉट क्रमांक ३०३-३२६३९ मध्ये बीजी-२ जिन्सचे प्रमाण ४९ टक्केच आहे. एसएससीएच-३३३ बीजी-२ या वाणाच्या लॉट क्रमांक ३०३-३११०८ मध्ये बीजी-२ जिन्सचे प्रमाण ४६ टक्केच आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती