शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी विसर्ग!

By admin | Updated: May 2, 2017 01:43 IST

महान- ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

महान : खांबोरा उन्नई बंधाऱ्याची पाणी पातळी खोलवर गेल्याने ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता महान धरणाच्या दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर धरणात २९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. महान धरणाचे सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास जवळपास दीड ते दोन दिवस लागते. पाणी पोहोचल्यावर महान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याचे महान पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी ६४ खेडी व मूर्तिजापूर शहर व गुरे-ढोरांसाठी आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी घेता येणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. महान धरणातून पाण्याचा विसर्ग ३१ मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता; परंतु खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरून ६४ खेडी गावांसह मूर्तिजापूर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा असल्याने महान धरणातून सर्वप्रथम १० एप्रिल ,२० एप्रिल व ३० एप्रिल असे एका महिन्यात दर दहा दिवसांनी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सध्या महान धरणात एकूण २९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे; तसेच अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून त्यापैकी दुसरा व्हॉल्व्ह पाण्यावरती उघडा पडला आहे. धरणातील सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडणे बंद करण्यात येईल. धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी बोरगाव मंजुचे नितनवरे, शाखा अभियंता सय्यद, जानोरकर, पिंपळकर, पाठक, शिराळे, हातोलकर, अकबर, शहा, अ. अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.