शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

महसूल विभागनिहाय बदलतात शिक्षण विभागातील नियम

By admin | Updated: June 12, 2015 02:02 IST

एकच धोरण असणे गरजेचे; विदर्भ व मराठवाडयात वेगवेगळे निकष.

राजेश शेगोकार/बुलडाणा : एकाच राज्यात शिक्षण क्षेत्रात एकच नियम असणे अपेक्षीत आहे. भौगोलीक परिस्थतीनुसार सुटया किंवा शाळांच्या वेळाबाबत अपवाद असु शकतो; मात्र शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नतीबाबत विदर्भ व मराठवाडयात नियमांमध्ये भिन्नता असल्याने या दोन विभागाच्या सिमेवर काम करणार्‍या शिक्षकांचा चांगलाच गोंधळ उडतो. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेला जालना जिल्हा हा मराठवाडा विभागात येतो. या ठिकाणी बुलडाणा परिसरातील अनेक शिक्षक विविध शाळांवर कार्यरत आहेत. त्यांना आपसी बदली करायची असेल किंवा पदोन्नतीसाठी नियम विचारायचा असेल तर बुलडाण्यात वेगळा व जालन्यात वेगळा नियम असल्याचा अनुभव येतो. याबाबत अनेक संघटनांनी शासनाकडे विचारणा केल्यावरही तेच धोरण कायम असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शाळांच्या वेळांपासून तर केंद्रीय मुख्याध्यापकांना असलेल्या अधिकारांबाबत अनेक बाबतीत विविधता आढळते, विविध सण उत्सवाच्या सुट्टीबाबतसुद्धा हीच परिस्थिती आहे. विदर्भात शाळा २६ जूनला तर उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनला सुरू होतात. प्रशासकीय कार्यपद्धतीमध्येही विभागा-विभागात भिन्नता असल्याने एकाच राज्यात वेगवेगळे नियम शिक्षण क्षेत्रातील लोकांना अनुभवास येतात. हे सर्व निकष एकजिनसी असावेत अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

असे आहेत वेगवेगळे निकष

1. मराठवाडा विभागातील शिक्षकांची बदली प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात होते. विदर्भात मात्र शिक्षकांची बदली प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात होत नाही.

2. मराठवाड्यात सर्व प्रकारचे अहवाल केंद्र शाळेमार्फत पाठवावे लागतात. अहवाल संकलन केन्द्र शाळेत होते . शिक्षकांना पंचायत समितीमध्ये यावे लागत नाही .विदर्भात अहवाल केंद्रप्रमुख जमा करतात. अनेक वेळा पंचायत समितीत शिक्षकांना यावे लागते व वेळेचा अपव्यय होतो.

3. मराठवाडा - केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रातील प्रशासकीय कामकाज पाहतो. उदा. केंद्रांतर्गत शाळेवरील शिक्षकांचे पगार बिले तयार करणे, केंद्रांतर्गत शाळा मुख्याध्यापकांची किरकोळ रजा मंजूर करणे. शिक्षकाला बदली झाल्यावर केंद्र शाळेवर रुजू व्हावे लागते. आजारी रजा, अर्जित रजा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून मंजुर झाल्यावर केंद्र मुख्याध्यापक पगार काढतात. सर्व प्रकारची वैद्यकीय बिले केंद्रीय मुख्याध्यापकामार्फत पंचायत समितिकडे सादर करावी लागतात . विदर्भ - केंद्रीय मुख्याध्यापकाचे पद असले तरी या प्रकारचे कोणतेच अधिकार या मुख्याध्यापकांना नाहीत .

4. मराठवाड्यात शिक्षकांची पदोन्नती प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात होते. विदर्भात शिक्षकांची पदोन्नती प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात होत नाही. त्यामुळे मराठवाडा विभागात प्राथमिक शाळेत काम करणार्‍या उच्च शिक्षित शिक्षकांना हायस्कूलवर पदोन्नती मिळते प्राथमिक, माध्यमिक या विभागात आप-आपसात बदली होते. त्यामुळे माध्यमिकमधील जागा रिक्त राहत नाहीत.

5. जालन्यात जि.प.शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४0 ते दूपारी ४ वाजेपर्यंत, तर शनिवारी सकाळी ७.४0 ते दूपारी १२ पर्यंत असते. बुलडाण्यात सकाळी १0.३0 ते ५ व शनिवारी सकाळी ७ ते १0.३0 असते.