शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून शासनाला कोटींचा फटका; राज्य वखार महामंडळाचा प्रताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:41 IST

धान्याची वाहतूक आणि हाताळणीच्या कामासाठी निविदेतील अटी व शर्तींचे पालन न करता दिलेल्या तात्पुरत्या कामासाठी राज्य वखार महामंडळाने दहा महिन्यांत दोन कोटी रुपये उधळले. हा अतिरिक्त खर्च देण्यास आता भारतीय खाद्य निगमने हात वर केले आहेत.

ठळक मुद्दे‘एफसीआय’ने केले हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धान्याची वाहतूक आणि हाताळणीच्या कामासाठी निविदेतील अटी व शर्तींचे पालन न करता दिलेल्या तात्पुरत्या कामासाठी राज्य वखार महामंडळाने दहा महिन्यांत दोन कोटी रुपये उधळले. हा अतिरिक्त खर्च देण्यास आता भारतीय खाद्य निगमने हात वर केले आहेत. दरम्यानच्या काळात काम न करणार्‍या कंत्राटदाराकडून वसुली न झाल्यास त्याचा फटका वखार महामंडळ पर्यायाने शासनाला बसणार आहे.भारतीय खाद्य निगमने धान्यसाठा करण्याचे खामगाव येथील काम २0१४ पासून राज्य वखार महामंडळाला दिले आहे. महामंडळाने रेल्वे धक्का ते वखारच्या गोदामापर्यंत धान्याची वाहतूक आणि हाताळणी करण्यासाठी १६ नोव्हेंबर २0१६ रोजी निविदेतून धुळे येथील जोशी फ्रेट कॅरियर्स यांना काम दिले. त्यांनी कार्यारंभ आदेश घेऊन काम सुरू केले नाही. त्यामुळे महामंडळाने १७ जानेवारी २0१७ रोजी तेच काम तात्पुरत्या कालावधीसाठी अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट यांना देण्यात आले. विशेष म्हणजे, काम देताना निविदेतून मंजूर ७७ टक्क्यांऐवजी १६0 टक्के दराने देण्यात आले. दोन महिन्यांसाठी दिलेले काम दहा महिने सुरू ठेवण्यात आले. त्यापोटी कोट्यवधींची देयके अदा करण्यात आली. त्यातून जवळपास १ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षाही अधिक रक्कम अतिरिक्त प्रदान केली. तात्पुरते काम देताना राज्य वखार महामंडळाने जोशी फ्रेट कॅरियर्स यांना नोटीस दिली. सोबतच भारतीय खाद्य निगमला पत्र देत काम आधीच्या कंत्राटदाराची जबाबदारी आणि वसुलीच्या पद्धतीनुसार दिल्याचे सांगितले. तसेच निविदेतील अटी व शर्तीनुसार जोशी फ्रेट कॅरियर्सवर कारवाई सुरू असल्याचेही कळवले. दरम्यान, कोणतीच कारवाई न झाल्याने भारतीय खाद्य निगमने १८ ऑक्टोबर २0१७ रोजी वखार महामंडळाला नोटीस दिली. त्यामध्ये खामगाव केंद्रातील काम करण्यास कंत्राटदार असर्मथ ठरला आहे. काम सुरू केल्यानंतर महिनाभराची र्मयादा असताना दहा महिन्यांत ८५ लाख रुपयांची बँक गॅरंटी दिली नाही. सोबतच ७७ टक्क्यांऐवजी १६0 टक्के दराने झालेल्या देयकाची रक्कम भारतीय खाद्य निगम देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. त्याशिवाय कंत्राटदाराचे काम थांबवून त्याच्यावर काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आले. महामंडळाने ती कारवाई न करता बँक गॅरंटी भरून काम सुरू करण्याचे पत्र दिले. 

‘एफसीआय’ची महामंडळाला पुन्हा नोटीसमहामंडळाने ठरलेल्या कालावधीत बँक गॅरंटी न घेता तसेच ८३ टक्के अधिक दराची वसुली न करता पुन्हा जोशी फ्रेट कॅरियर्स यांना काम दिले. त्यावर एफसीआयने ११ डिसेंबर २0१७ रोजी महामंडळाला पुन्हा नोटीस बजावली. त्यामध्ये निविदेत ठरलेल्या १५ नोव्हेंबर २0१८ पर्यंतच्या कालावधीसाठी मंजूर ७७ टक्के दरानुसारच एफसीआयकडून देयक दिले जातील, असे एफसीआयच्या सहायक महाव्यवस्थापकांनी पत्रात म्हटले. त्यामुळे वखार महामंडळाच्या अडचणी वाढल्या. तसेच १ कोटी ८५ लाखांचा फटकाही बसणार आहे.

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती