शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण; आ. बाजोरियांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 13:30 IST

उपप्रादेशिक कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत शुक्रवारी शहरातील काही शासकीय कार्यालयांची पाहणी केली.

ठळक मुद्देआरटीओ कार्यालयाचे तीन वर्षांपूर्वी स्थानांतरण होऊन रेल्वे स्टेशन चौकातील मनपाच्या शाळेत कार्यान्वित करण्यात आले होते. कोसळणारे छत व गळक्या छतामुळे पावसात भिजणारे दस्तऐवज आदी समस्यांचा सामना करताना वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. अखेर जीर्ण इमारतीचा धोका लक्षात घेता आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोला: उपप्रादेशिक कार्यालयाची (आरटीओ) इमारत जीर्ण झाल्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता या कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत शुक्रवारी शहरातील काही शासकीय कार्यालयांची पाहणी केली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार व इतर अधिकारी उपस्थित होते.अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या आरटीओ कार्यालयाचे तीन वर्षांपूर्वी स्थानांतरण होऊन रेल्वे स्टेशन चौकातील मनपाच्या शाळेत कार्यान्वित करण्यात आले होते. या इमारतीचे भाडे महापालिका प्रशासनाकडे जमा केले जाते. दरम्यान, इमारतीची रचना पाहता या ठिकाणी कामकाज करणे अधिकारी-कर्मचाºयांसाठी अवघड झाले आहे. वाहने ठेवण्यासाठी तोकडी जागा, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतागृहाचा अभाव, जीर्ण झालेली इमारत, ठिकठिकाणी कोसळणारे छत व गळक्या छतामुळे पावसात भिजणारे दस्तऐवज आदी समस्यांचा सामना करताना वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊन परवाना मिळविण्यासाठी येणाºया नागरिकांचीही कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात मागील वर्षभरापूर्वी आ.गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. संबंधित अधिकाºयांनीसुद्धा ही समस्या सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने आ.बाजोरियांनी सदर कार्यालयाची दोन वेळा पाहणी केली. अखेर जीर्ण इमारतीचा धोका लक्षात घेता आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आ.बाजोरिया यांनी शुक्रवारी आरटीओ कार्यालयाची पाहणी करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्यासोबत चर्चा केली, तसेच शहरातील इतर कार्यालयांची पाहणी केली. यावेळी शहर प्रमुख तथा मनपा गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.‘बीएसएनएल’ कार्यालयाची पाहणी‘आरटीओ’ कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आ.बाजोरिया यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांच्यासह इतर अधिकाºयांनी याच परिसरातील ‘बीएसएनएल’ कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतरही जागेची पाहणी क रण्यात आली.स्लॅब कोसळला; दस्तऐवज वाºयावरमनपा शाळेच्या इमारतीत आरटीओ कार्यालय थाटण्यात आले. ही इमारत जुनी असल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दस्तऐवज ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एका खोलीत पोत्यांमध्ये भरून दस्तऐवज ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. जीर्ण झालेले दस्तऐवज रामभरोसे असल्याचे आढळून आले.--फोटो--सीटीसीएल झाला आहे,अवश्य घेणे---

 

टॅग्स :AkolaअकोलाRto officeआरटीओ ऑफीसGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीया