शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीही रेंगाळणार!

By admin | Updated: March 12, 2016 02:33 IST

शिक्षण विभागात नियोजनाचा अभाव;नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत.

खामगाव : शाळांची प्रवेश प्रकिया सुरू झाली असली तरी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया राज्यातील काही जिल्हे वगळता अद्याप सुरू झालेली नाही. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे नियोजन नसल्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पूर्वनियोजित तारखेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. आरटीई अँक्ट २00९ मध्ये पारित झाला. यानुसार सर्व मान्यताप्राप्त अनुदानित-विनाअनुदानित शाळांनी पहिल्या वर्गात प्रवेश देताना २५ टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, असा दंडक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने यावर्षीदेखील आरटीईच्या प्रवेशासंदर्भात वेळापत्रक निश्‍चित केले होते. त्यानुसार २७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत शाळांना आपली नोंदणी करणे आवश्यक होते, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु होणार होती; मात्र दिलेल्या कालावधीत शाळांची नोंदणी वेबसाइटवरील तांत्रिक अडचणीमुळे अद्याप होऊ शकलेली नाही.वेबसाइटवर नाशिक विभागाकरिता ३ मार्चपासून, तर रायगड जिल्ह्यात ११ मार्चपासून शाळांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. इतर जिल्ह्यांसाठी मात्र अद्याप तारीख देण्यात आलेली नाही. परिणामी पालक संभ्रमित झाले आहेत. एकीकडे शाळांनी त्यांची नियमित प्रवेश प्रकिया सुरू केली आहे. आरटीईत प्रवेश मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या पालकांपुढे मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. आरटीईत प्रवेशासाठी थांबलो, तर खुल्या पद्धतीने प्रवेश मिळण्याची तारीख निघून जाईल. त्यामुळे काय करावे, यावर्षी पालक संभ्रमित आहेत. -प्रवेशासाठी तारीख निश्‍चित नाहीयापूर्वी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २७ फेब्रुवारी ते ९ मार्च ही तारीख दिली होती, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू होणार होती; परंतु ११ मार्च उगवला तरी शाळांची नोंद होऊ शकलेली नाही. मग विद्यार्थ्यांनी प्रवेश करायचा केव्हा, हा प्रश्न कायम आहे. नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा पालकांना आहे.