शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रिया : आरटीईसाठी अर्ज केला का? शुक्रवार शेवटचा दिवस, १९४६ जागांसाठी ५५९१ अर्ज

By atul.jaiswal | Updated: March 16, 2023 17:28 IST

RTE Admission Process : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे.

- अतुल जयस्वालअकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. राखीव असलेल्या जागांसाठी अर्ज करण्यासाठी शुक्रवार, १७ मार्च ही शेवटची तारीख असल्याने ज्यांनी आतापर्यंत अर्ज भरले नसतील, त्यांना घाई करावी लागणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मांतील विकलांग बालके आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी पात्र आहेत. यावर्षी जिल्ह्यातील १९० शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केलेली असून, या शाळांमध्ये १९४६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवार, १६ मार्चपर्यंत ५५९१ अर्ज दाखल झाल्याची नोंद आरटीई पोर्टलवर आहे. आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ मार्च २०२३ पासून सुरू झाली असून शुक्रवार, १७ मार्च ही शेवटची तारीख आहे. शेवटच्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने संकेतस्थळाची गती मंदावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAkolaअकोला