शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई' : २५ टक्के राखीव जागांवर १३९0 विद्यार्थ्यांचे प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:49 IST

अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे

अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेतला आहे. आता ५१0 जागा उरल्या असून, या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई नोंदणीकृत २0७ शाळांमध्ये एकूण २३७५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ‘आरटीई’ अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज मागविले होते. पालकांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात दुर्बल व वंचित घटकांतील तब्बल ६ हजार ४१४ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८६५ पाल्यांची पहिल्या टप्प्यात इंग्रजी व मराठी शाळांमधील राखीव जागांसाठी निवड करण्यात आली. आता तिसºया टप्प्यात उर्वरित ५१0 जागा भरण्यात येतील का, त्यासाठी सोडत काढण्यात येणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील व शहरातील नामांकित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झाले आहेत.  भाडे करारनामा, तांत्रिक त्रुटींमुळे शेकडो पालक वंचित‘आरटीई’च्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी बाहेरगावच्या पालकांना भाडेकरारनामा सादर करावा लागतो; परंतु भाडेकरारनामा मिळण्यात अडचणी येत असल्याने तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे शेकडो पालकांनी अर्ज करूनही त्यांना प्रवेशपासून वंचित राहावे लागत आहे. महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नसणे, शाळांकडून प्रवेशासाठी नकारघंटा मिळणे आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे ५00 च्या जवळपास जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.‘आरटीई’ प्रवेशाची अशी आहे स्थिती!एकूण शाळा- २0७एकूण जागा- २३७५एकूण अर्ज- ६४१४निवड झालेले विद्यार्थी- १८६५प्रवेशित विद्यार्थी- १३९0

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदा