शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

रासप राज्यात विधानसभेच्या १२ जागा लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:31 IST

अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत बक्षीस म्हणून घवघवीत जागा मिळणार असल्याचे संकेत असून, राष्ट्रीय   समाज पक्षाला राज्यात १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत बक्षीस म्हणून घवघवीत जागा मिळणार असल्याचे संकेत असून, राष्ट्रीय   समाज पक्षाला राज्यात १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. यात रासपतर्फे अकोला जिल्ह्यातील एका मतदारसंघात निवडणूक लढण्यात येणार आहे. तशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून रासपच्या जिल्हा कार्यकारिणीला प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एक माजी आमदार व तीन जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या संपर्कात असल्याचेही जिल्हा रासपच्यावतीने सांगण्यात येत आहे.महादेवराव जाणकर प्रणित राष्ट्रीय   समाज पक्ष राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीसोबत आहे. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात जाणकर दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून रासपला एकही जागा मिळाली नाही, त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तथापि, जाणकर यांच्या खातर कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. महायुतीचाच धर्म पाळत घटक पक्षांना विधानसभेच्या समाधानकारक जागा सोडल्या जाणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय   समाज पक्षाला १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात एक जागा सोडली जाणार असल्याने जिल्हा रासप एका विधानसभा मतदार संघाची चाचपणी करीत आहे. अकोट व बाळापूर हे दोन विधानसभा मतदार संघ रासपला निवडणूक लढविण्यासाठी सोयीचे वाटत असल्याने या दोन मतदार संघांपैकी एक मतदार संघ निवडला जाणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी रासप जिल्हाध्यक्षाचे नावही चर्चेत असून, कार्यकर्तेही अनुकूल आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एक जागा लढण्यात येणार असल्याने यासाठी एक माजी आमदार व तीन जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हा रासपकडून प्राप्त झाली. यामध्ये काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश आहे.

 विधानसभेच्या १२ जागा रासपला सोडण्यात येणार आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातही एक जागा मिळणार असल्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष महादेवराव जाणकर यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने मतदार संघाची चाचपणी सुरू केली असून, बाळापूर व अकोट मतदार संघाची माहिती गोळा केली जात आहे. यासाठी एक माजी आमदार व तीन जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या संपर्कात आहेत. यात काँग्रेसचा समावेश आहे.- सतीश हांडे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय   समाज पक्ष, अकोला. 

 

टॅग्स :Politicsराजकारण