शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

पातूर पंचायत समितीला ३.६४ कोटींचा दंड!

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

नगर परिषदेलाही २.६१ कोटींचा दंड : गौण खनिज ‘रॉयल्टी’ची चुकवेगिरी

पातूर: तालुक्यातील विविध कामांसाठी मुरुम, वाळू, गिट्टी, माती आदी गौण खनिजाचा वापर करताना त्यापोटी द्याव्या लागणार्‍या स्वामित्व धन (रॉयल्टी) शुल्काचा पूर्णपणे भरणा न केल्याप्रकरणी पातूर पंचायत समितीला ३.६४ कोटी रुपये, तर नगर परिषदेला २.६१ कोटी रुपयांचा दंड तहसीलदार राजेश वझीरे यांनी ठोठावला आहे. याबाबतची नोटीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना बजावण्यात आली आहे. पातूर तालुक्यात पंचायत समितीच्यावतीने ८१ गावांमध्ये सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, रस्त्याचे काम, समाजमंदिर बांधकाम, दुरुस्ती, आवारभिंत बांधकाम अशी विविध विकासकामे करताना मुरुम, वाळू, गिट्टी आदी गौणखनिजाचा वापर करण्यात आला. या वापरापोटी ३ कोटी ८७ लाख ७ हजार ९६ रुपयांचे स्वामित्व धन शुल्क भरणे गरजेचे होते; परंतु पंचायत समितीकडून फक्त २ लाख ३५ हजार ८00 रुपयांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे उर्वरित ३ कोटी ६४ लाख १३0४ रुपयांची वसुली करण्याची नोटीस गटविकास अधिकारी यांना पाठविली आहे. नगर परिषदेने शहरात केलेल्या विविध २२ कामांवर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचे परवाने जोडले नसल्याने त्यांना २ कोटी ६१ लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. वाळूकरिता स्वामित्व धनाची रक्कम ८३३ रुपये असून, गिट्टी, मुरुमाकरिता प्रतिब्रास स्वामित्व धनाची रक्कम ११ मे २0१५ पर्यंत २00 रुपये, तर त्यानंतर ४00 रुपये करण्यात आली आहे. स्वामित्व धनावर दंडाची रक्कम १२ जून १0१५ पर्यंत तीनपट व त्यानंतर पाचपट करण्यात आली आहे. सदर काम शासकीय यंत्रणेने केले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या मौखिक निर्देशाप्रमाणे दंडाची रक्कम कामात वापरण्यात आलेल्या गौण खनिजाच्या बाजारभावाच्या तीनपट किंवा पाचपट न आकारता, केवळ वेळावेळी वाढलेल्या गौण खनिजाच्या स्वामित्व धनाच्या तीनपट किंवा पाचपट लावण्यात आल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.