शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

३४ कोटींच्या थकीत मालमत्ता कराकडे दुर्लक्ष; कर बुडवणाऱ्यांना अकोला मनपाचे अभय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:44 IST

अकोला : महापालिकेच्या वसुली लिपिकांनी मालमत्ताधारकांजवळून तब्बल ३४ कोटींचा मालमत्ता कर वसूल न करताच तो दडवून ठेवला. यामध्ये प्रामुख्याने स्लम भागातील मालमत्ताधारकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनवीन भागासह शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले असता, १ लाख ५३ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. वसुली लिपिकांनी २००२ पासून शहराच्या स्लम भागातील नागरिकांजवळून मालमत्ता कराची वसुली न करता दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही थकबाकी वसूल करण्याचे निर्देश त्यांनी वसुली लिपिकांना दिले होते.

अकोला : महापालिकेच्या वसुली लिपिकांनी मालमत्ताधारकांजवळून तब्बल ३४ कोटींचा मालमत्ता कर वसूल न करताच तो दडवून ठेवला. यामध्ये प्रामुख्याने स्लम भागातील मालमत्ताधारकांचा समावेश आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेत, ३४ कोटींचा थकीत कर वसूल करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. ‘जीआयएस’द्वारे केलेल्या पुनर्मूल्यांकनामुळे हा प्रकार उघडकीस आला असला, तरी आजपर्यंत एवढा मोठा कर बुडवणाºयांना मनपाचे अभय कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे.मागील १८ वर्षांपासून शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन रखडल्यामुळे एकूण मालमत्ता किती, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचा परिणाम मनपाच्या उत्पन्नावर झाला. मालमत्ता कर वसुली विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्तांची नोंद होती. त्यापासून प्रशासनाला वार्षिक अवघे १६ ते १७ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत असे. यातही दरवर्षी सहा ते सात कोटींची थकबाकी दाखवल्या जात होती. अर्थात थकबाकीचा आकडा आठ कोटींच्या पलीकडे क धीही गेला नाही. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन केले. ‘स्थापत्य कन्सलटन्ट’ने हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन भागासह शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले असता, १ लाख ५३ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. यादरम्यान, एजन्सीने मालमत्ताधारक आणि वसुली लिपिकांच्या दस्तऐवजांची छाननी केली असता, वसुली लिपिकांनी २००२ पासून शहराच्या स्लम भागातील नागरिकांजवळून मालमत्ता कराची वसुली न करता दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ही थकीत रक्कम तब्बल ३४ कोटींपेक्षा जास्त आहे. कर्मचाºयांच्या थकीत वेतनाची समस्या लक्षात घेता आयुक्त वाघ यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता, ३४ कोटींच्या थकबाकीचा मुद्दा समोर आला होता. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही थकबाकी वसूल करण्याचे निर्देश त्यांनी वसुली लिपिकांना दिले होते. ही मुदत संपण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे वसुली लिपिक काय दिवे लावतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका