शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:43 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांमध्ये नाराजी  मानधन वाढीची शासनाकडे मागणी

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतस्तर आणि यंत्रणांकडून करण्यात येणार्‍या विविध कामांच्या अंमलबजावणीचे काम कंत्राटी तत्त्वावरील कर्मचार्‍यांकडून करण्यात येते. राज्यात जिल्हा ते ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍या या कर्मचार्‍यांना दरमहा मिळणारे मानधन तुटपुंजे असून, दरमहा कमी मिळणारे मानधनही वेळेवर मिळत नाही. कामाच्या तुलनेत मानधन मिळत नसल्याने, रोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दरमहा मिळणार्‍या मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे करण्यात येत आहे. 

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या कामाचे स्वरूप!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचार्‍यांकडून जिल्हानिहाय कामांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने कामांचे नियोजन, समन्वय, संबंधित यंत्रणेच्या अधिकार्‍यांना मदत करणे, रोहयो कामांवरील मजुरांना मजुरी प्रदान करणे, कामांच्या नोंदी, अहवाल तयार इत्यादी प्रकारची कामे केली जातात.

राज्यात असे आहेत कंत्राटी कर्मचारी!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये ३ हजार ५00 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हा एमआयएस समन्वयक, समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, तालुकास्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी, पालक तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि ग्राम रोजगारसेवक इत्यादी संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कंत्राटी तत्त्वावरील या कर्मचार्‍यांना संवर्गनिहाय दरमहा १६ हजार रुपये ते ८ हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते.