शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प !

By संतोष येलकर | Updated: May 8, 2023 17:25 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो ) अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावरील कामांवर गटविकास अधिकारी(बीडीओ) सहायक गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी बहिष्कार असल्याने, जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्यास्तरावरील ‘रोहयो’ची कामे ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्हयात ग्रामपंचायतस्तरावरील ‘रोहयो’ ची कामे अडकली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतींच्या स्तरावरील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात.

कामांची अंमलबजावणी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत केली जाते; परंतु पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (नरेगा) आदींसह महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी गेल्या १० एप्रिलपासून ‘रोहयो’च्या कामांवर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये ‘रोहयो ’ कामांच्या मजुरी मस्टरवर स्वाक्षरीसह नवीन कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ‘रोहयो’ ची विविध कामे अडकली आहेत. महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावरील ‘रोहयो’ची कामे ठप्पच असल्याचे वास्तव आहे.

तालुकानिहाय अशी आहे ग्रामपंचायतींची संख्या

तालुका            ग्रा.पं.अकोला            ९७

अकोट             ८५बाळापूर ६६

बार्शीटाकळी ८२मूर्तिजापूर ८६

पातूर             ५७तेल्हारा ६२

घरकुल, पाणंद रस्त्यांसह विविध कामे ठप्प 

जिल्ह्यात गेल्या ११ एप्रिलपासून ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोची कामे ठप्प आहेत. त्यामध्ये घरकुल, मातोश्री शेतपाणंद रस्ते कामांसह सिंचन विहीर, विहिरींचे पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्षसंगोपन, गुरांचे गोठे, चंदन लागवड, शेळी व कुक्कुटपालन शेड आदी कामे ठप्प आहेत.

यंत्रणांची केवळ ५६ कामे सुरूरोहयोंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामे ठप्प असून, शासनाच्या विविध यंत्रणांची केवळ ५६ कामे सुरू असून, त्यावर ६४२ मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.

काम कसे करणार?पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचा रोहयो कामांवर बहिष्कार असल्याने, कामांच्या मजुरी मस्टरला मंजुरी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो कामांवरील मजुरांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे ‘रोहयो’ चे काम कसे करणार, याबाबत मजुरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोला