संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २0१६-१७ या वर्षीच्या कामांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गावनिहाय मजूर कुटुंबांच्या काम मागणीचे आराखडे (लेबर बजेट ) ग्रामपंचायत स्तरावर तयार करण्यात आले आहेत. या गावनिहाय ह्यलेबर बजेटह्णच्या आधारे जिल्हानिहाय रोहयो ह्यलेबर बजेटह्ण तयार करण्यात येणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयांच्या विविध कामांचे ह्यलेबर बजेटह्ण जिल्हा स्तरावर तयार केले जाते. त्यानुषंगाने सन २0१६-१७ या वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर गावातील मजूर कुटुंबांच्या मागणीनुसार ह्यलेबर बजेटह्ण तयार करण्यात आले. रोहयो अंतर्गत या वर्षात गावात करावयाची कामे, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, गावातील मजूर कुटुंबांकडून वर्षभरातील कामांची मागणी, किती दिवस काम करणार, यासंबंधी ग्रामसभांच्या मंजुरीनंतर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक व ग्राम रोजगारसेवकांमार्फत ह्यलेबर बजेटह्ण तयार करण्यात आले. मजूर कुटुंबांच्या मागणीनुसार तयार करण्यात आलेले ह्यलेबर बजेटह्ण ग्रामपंचायतींमार्फत संबंधित पंचायत समित्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. पंचायत समितींच्या लेबर बजेट (आराखडे) नुसार जिल्हाधिकारी कार्यालयांच्या रोहयो विभागांमार्फत जिल्हास्तरीय लेबर बजेट तयार करण्यात येणार आहेत. तयार करण्यात आलेले हे बजेट जिल्हा परिषदांच्या सर्वसाधारण सभांमध्ये मान्यतेनंतर या लेबर बजेटनुसार जिल्हास्तरीय रोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर लवकरच तयार होणार बजेट! ग्रामपंचायत स्तरावर तयार करण्यात आलेले रोहयो कामांचे लेबर बजेट पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या रोहयो विभागामार्फत रोहयो अंतर्गत जिल्हास्तरीय लेबर बजेट लवकरच तयार करण्यात येणार आहे.रोहयो आयुक्तांनी घेतला आढावा! महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात ग्रामपंचायत स्तरावर तयार करण्यात आलेल्या लेबर बजेट कामांचा आढावा रोहयो राज्य आयुक्त महाजन यांनी ४ नोव्हेंबर रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.
रोहयो कामांचे ग्रामपंचायत स्तरावर ‘लेबर बजेट’ तयार
By admin | Updated: November 5, 2015 01:56 IST